Wednesday, September 03, 2025 08:24:42 PM

सतत चहा पिण्याचा मोह का होतो? डॉक्टरांनी दिलं आरोग्यदायी उत्तर

आपल्यापैकी अनेकांना, गरम चहाशिवाय सकाळ अपूर्ण वाटते. याचं कारण म्हणजे, बहुतांश भारतीय लोक सकाळ सकाळी डोळे उघडताच एक कप चहा किंवा कॉफी पिणे पसंत करतात.

सतत चहा पिण्याचा मोह का होतो डॉक्टरांनी दिलं आरोग्यदायी उत्तर

मुंबई: आपल्यापैकी अनेकांना, गरम चहाशिवाय सकाळ अपूर्ण वाटते. याचं कारण म्हणजे, बहुतांश भारतीय लोक सकाळ सकाळी डोळे उघडताच एक कप चहा किंवा कॉफी पिणे पसंत करतात. अनेकांसाठी हा त्यांच्या दैनंदिन जीवनातला अविभाज्य घटक आहे. भारतीयांसाठी चहा केवळ एक पेय नसून एक भावना आहे. मात्र, सकाळी अनुषा पोटी चहा किंवा पिणे आरोग्यासाठी चांगले घातक मानले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल आणि तुम्हाला ती पुन्हा पुन्हा पिण्याची इच्छा होत असेल तर हे सामान्य आहे की त्यामागे काही आरोग्य संबंधी समस्या आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया. 

हेही वाचा: Nagpur: वसतिगृहात घुसून मुलीचा विनयभंग; 64 मुलींमध्ये भीतीचे वातावरण

रिकाम्या पोटी चहा प्यावा का नाही?

डॉ. दीप्ती खतुजा यांच्या मते, 'सकाळचा चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये. यामुळे गॅस, अपचन आणि पोटाशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. जर तुम्ही सकाळी चहा किंवा कॉफी पीत असाल तर त्यासोबत बदाम किंवा सुकामेवा खा.

दिवसातून किती कप चहा प्यावा?

'दिवसातून 2-3 कपपेक्षा जास्त चहा पिऊ नये. यापेक्षा जास्त चहा किंवा कॉफी पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते', असं डॉ. दीप्ती खतुजा म्हणाल्या. 

चहा पिण्याची तलब का निर्माण होते?

बऱ्याचदा, आपण पाहतो की, अनेकांना वारंवार चहा प्यावासा वाटतो. यावर डॉ. दीप्ती खतुजा म्हणाल्या की, 'जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर ही समस्या नसून मानसिकता असू शकते. कारण जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खूप आवडते, तेव्हा आपल्याला ती पुन्हा पुन्हा प्यावीशी वाटते.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री