Wednesday, September 03, 2025 09:02:28 PM

Hair Growth Tips: केस लांब, जाड होण्यासाठी 'या' पाच पदार्थांचं तेल बनवा, भाग्यश्रीने सांगितला रामबाण उपाय

नैसर्गिक पद्धतीने केसांचे आरोग्य सुधारावे असे वाटले तरी कुठला उपाय खरोखर परिणामकारक आहे, याबाबत समजत नाही. पण हा घरगुती उपाय...

hair growth tips केस लांब जाड होण्यासाठी या पाच पदार्थांचं तेल बनवा भाग्यश्रीने सांगितला रामबाण उपाय

Hair Growth Tips: बऱ्याच महिला केस गळणे, पातळ होणे किंवा लवकर पांढरे होणे या समस्यांनी त्रासलेल्या असतात. महागडे शॅम्पू, कंडिशनर, सिरम वापरूनही फारसा फरक पडत नाही, उलट केमिकल्समुळे केस अजून कमकुवत होतात. नैसर्गिक पद्धतीने केसांचे आरोग्य सुधारावे असे वाटले तरी कुठला उपाय खरोखर परिणामकारक आहे, याबाबत समजत नाही. पण हा घरगुती उपाय केला तर केसांचे आरोग्य सुधारेल. चला तर मग जाणून घेऊया असा एक खास घरगुती तेलाचा उपाय, ज्याबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितले आहे. योग्य पद्धतीने वापरल्यास महिनाभरातच केसांच्या आरोग्यात फरक दिसून येऊ शकतो.

केसांसाठी आवश्यक नैसर्गिक घटकांचा वापर
या विशेष तेलामध्ये पाच महत्त्वाचे घटक वापरले जातात. नारळ तेल, मेथीदाणे, कढीपत्ता, जास्वंदीची फुले आणि कांद्याचा रस. हे सर्व पदार्थ स्वयंपाकघरात सहज मिळणारे असून, प्रत्येकाचा केसांच्या आरोग्यासाठी वेगळा फायदा आहे. नारळ तेल केसांना मऊ व पोषणयुक्त बनवते, तर उर्वरित घटक केसांची वाढ आणि गळती कमी करतात.

तेल बनवण्याची योग्य पद्धत
सर्वप्रथम एका पातेल्यात नारळ तेल गरम करून त्यात मेथीदाणे टाका. नंतर कढीपत्ता घालून तो थोडा कुरकुरीत होऊ द्या. त्यानंतर जास्वंदीची फुले टाकून मिश्रण मंद आचेवर शिजवा. गॅस बंद करून तेल थंड होऊ द्या आणि शेवटी त्यात ताज्या कांद्याचा रस मिसळा. हे तेल एक दिवस उन्हात ठेवा. यानंतर त्याची परिणामकारकता अधिक वाढते.

हेही वाचा: Mushroom Health Benefits: फक्त चवदारच नाही, मशरूम तुमच्या आरोग्यासाठीही आहे सुपरफूड ; जाणून घ्या फायदे

प्रत्येक घटकाचा केसांवरील परिणाम
​मेथी दाण्यांत फॉलिक अ‍ॅसिड, जीवनसत्त्वे A, K, C आणि खनिजे असल्याने केसांना मुळापासून पोषण मिळते. कढीपत्त्यातील अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म केस अकाली पांढरे होण्यापासून वाचवतात. जास्वंदीची फुले केसांना कंडिशन करून वाढीस चालना देतात. कांद्याच्या रसातील सल्फर रक्ताभिसरण सुधारतो आणि डॅन्ड्रफ कमी करतो. नारळ तेल केसांचे नुकसान भरून काढते व त्यांना लवचिक ठेवते.

वापरण्याची पद्धत
या तेलाचा फायदा मिळवण्यासाठी ते आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरणे आवश्यक आहे. केस धुण्याच्या एक तास आधी हे तेल मुळांपासून टोकापर्यंत हलक्या हाताने लावा आणि सौम्य मसाज करा. यामुळे तेलीतील प्रत्येक घटक केसांच्या मुळांपर्यंत पोहोचून त्यांना आवश्यक पोषण देतो.

 

नियमित वापराचे दीर्घकालीन फायदे
हा उपाय नियमितपणे केल्यास एक महिन्यात केस गळणे कमी होते, नवीन केसांची वाढ होते आणि केस मऊ व चमकदार होतात. नैसर्गिक घटक असल्याने कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत. मात्र, अत्यंत संवेदनशील टाळूसाठी आधी थोडे वापरा. योग्य आहार आणि केसांची स्वच्छता राखल्यास हा उपाय दीर्घकाळ परिणामकारक ठरतो.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री