Monday, September 01, 2025 12:35:58 PM

रात्री झोप लागत नाही? तर वेळीच करा 'हे' उपाय

रात्री झोप लागत नाही तर वेळीच करा हे उपाय

झोप आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका साकारते. झोप आपल्याला दिवसभरातील दैनंदिन काम करण्यास एनर्जी देते. त्यासोबत झोप तुम्हाला दिवसभर फ्रेश राहण्यासदेखील मदत करते. झोप पूर्ण न झाल्यास आपल्याला आळस आणि थकवा येत राहतो. डॉक्टर्स आपल्याला किमान 8 तासाची झोप घेण्यास सांगतात. मात्र अनेकदा आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, खाण्या-पिण्याच्या वेळेमध्ये बदल झाल्यामुळे, ताण-तणाव वाढल्यामुळे आपल्याला अनेक त्रास उद्भवतात. त्यामुळे आपल्याला ऍसिडिटी, डोकेदुखी, अशक्तपणा अशा अनेक समस्या जाणवू लागतात. अनेकांना लगेच झोप लागते, मात्र काहीजणांना बराच वेळ झाला तरी सुद्धा झोप काही केल्या येत नाही. जाणून घ्या झोप न येण्यामागे नेमकी काय कारणं असतात. 

हेही वाचा: फळ विक्रेते फळांना पेपरमध्ये का ठेवतात?

1 - ताणतणाव (स्ट्रेस):

सतत डोक्यांत येणारे असंख्य विचार आणि ताणतणाव हे सर्व झोप न येण्यामागचे मुख्य कारण असते. ताणतणावामुळे कोर्टीसोल नावाच्या हॉर्मोनच्या संख्येमध्ये वाढ होते, ज्यामुळे मेंदू ऍक्टिव्ह मोडमध्ये जातो. ज्यामुळे आपल्याला लवकर झोप येत नाही. वाढत्या ताणतणावामुळे झोप येत नाही. मात्र त्यामुळे डोळ्याखाली काळे डाग आणि चेहऱ्यावर सुरकुत्यादेखील येण्यास सुरुवात होते. 

2 - अधिक स्क्रीनटाइम:

लॅपटॉप, पीसी किंवा मोबाईलवर जर तुम्ही अधिक वेळ घालवत असाल तर त्यातून बाहेर येणाऱ्या घाटक रेडिएशन्समुळे डोळ्यांवर अधिक ताण येतो आणि त्यामुळे तुमचा मेंदू दुखू लागतो. ज्यामुळे आपल्याला लवकर झोप येत नाही. यांमुळे आपल्या जीवनशैलीवर देखील उलट परिणाम पाहायला मिळतो. 

3 - पाणी कमी पिण्याची सवय:

दिवसभराच्या व्यस्त दिनचर्येमुळे अनेकांना पाणी पिण्याचे लक्षातच राहत नाही. जेव्हा अचानक घसा कोरडा होतो तेव्हा आपण पाणी पितो. मात्र वेळोवेळी पाणी न पिल्यामुळे लोकांना डीहायड्रेशनचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो, ज्यामुळे अनेकदा आपल्याला अशक्तपणादेखील जाणवू लागते. कमी पाणी पिल्यामुळे नैराश्य येण्याचे प्रमाण देखील वाढते आणि झोपेवर परिणाम होतो. दिवसभरात किमान ५-६ लिटर पाणी पिल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यास मदत होते. 

4 - मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता:

जर शरीरात मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी यांसारख्या घटकांची कमी असेल तर त्याचा परिणाम थेट झोपेवर होतो. मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी शरीरासाठी खूप गरजेचे असून जर ते आपल्याला योग्य प्रमाणात नाही मिळाल्या तर झोपेवर परिणाम दिसण्यास सुरु होतो. 

हेही वाचा: Pistachios Benefits: पिस्ता एक फायदे अनेक

झोप लवकर येण्यासाठी करा 'हे' उपाय:

1 - झोपण्याआधी स्क्रीन पाहणे जितके जास्त होईल तितके टाळा.

2 - झोपण्यापूर्वी शांत संगीत ऐका, ज्यामुळे तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होईल.

3 - झोपण्यासाठी आरामदायी बेड आणि उशा वापरा. ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागेल.

4  - झोपण्यापूर्वी फोन स्वत:पासून लांब ठेवा. 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री