सौंदर्य जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी पूर्वी आपले आजी-आजोबा अनेक नैसर्गिक उपाय करत होते. त्यामुळे वयाची साठी ओलांडली तरीसुद्धा आजही त्या तरुण दिसतात. मात्र सध्या मार्केटमध्ये आलेल्या ब्युटी प्रॉडक्ट्सने संपूर्ण बाजारपेठ आपल्या ताब्यात केले. या ब्युटी प्रॉडक्ट्समध्ये वापरल्या जाणाऱ्या घातक चेमिकल्समुळे चेहऱ्यावर दुष्परिणाम होतात. तरीसुद्धा अनेकजण या ब्युटी प्रॉडक्ट्सना मोठ्या संख्येने वापरतात. केमिकल्सच्या वाढत्या दुष्परिणांमुळे अनेकजण नैसर्गिक उपाय करण्यास सुरुवात करू लागले. सध्या अनेकजण फेस मास्क आपल्या चेहऱ्याला लावत आहेत. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स, सुरकुत्या दूर होऊन त्वचा अधिक तरुण दिसते. पण तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल आणि ते म्हणजे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यासाठी कोणते उपाय करायला हवे? चला तर जाणून घेऊया.
1 - कडुनिंबाचा फेस पॅक:
केसांसोबत चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कडुनिंबाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कडुनिंबांच्या पानांमध्ये जास्त प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. कडुनिंबाचा फेस पॅक चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि पिंपल्स कमी होण्यासाठी मदत करतात.
हेही वाचा: पचनासाठी फायदेशीर असणाऱ्या लिंबाचे फायदे जाणून घ्या
2 - नारळाच्या पाण्याचा फेस पॅक:
नारळाचा प्रत्येक भाग हा गुणकारी असतो. नारळ पाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. नारळाच्या पाण्यात हळद आणि थोडेसे गुलाबजल टाकून त्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार होते. सोबतच शरीरातील पीएच पातळी संतुलित होते आणि त्वचेला नवी चमक देते.
3 - तुळशीच्या पानाचा फेस पॅक:
तुळशीच्या पानाचा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा वाळलेल्या तुळशीची पावडर आणि तेवढेच दही घेऊन घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट नीट मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनंतर, ते स्क्रब करा आणि आपला चेहरा चांगला धुवा. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. सोबतच तुळशीच्या पानाचा फेस पॅक त्वचेला आणखी तजेलदार बनवते.
हेही वाचा: रात्री झोप लागत नाही? तर वेळीच करा 'हे' उपाय
4 - बेसनाचा फेस पॅक:
बेसनमध्ये एंटीफंगल आणि एंटीबॅक्टेरिअल गुण असतात. त्यामुळे बेसनाचा फेस पॅक चेहरा चमकण्यास सुरुवात होते आणि त्वचा स्वच्छ होते. बेसनामध्ये हळद आणि दूध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा टवटवीत दिसू लागतो.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)