उन्हाळा सुरू झाला की बाजारात कलिंगड आणि खरबूज मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. दोन्ही फळे रसाळ, गोडसर आणि पचनास हलकी असतात. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने कोणते अधिक फायदेशीर आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊया दोन्ही फळांचे फायदे आणि कोणते अधिक उपयुक्त ठरू शकते.
कलिंगडचे फायदे
शरीर हायड्रेट ठेवते – कलिंगडमध्ये 92% पाणी असते, त्यामुळे उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते.
हृदयासाठी फायदेशीर – यात लायकोपीन आणि सायट्रूलिनसारखे घटक असतात, जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यास मदत – कमी कॅलरी आणि भरपूर फायबर असल्याने हे वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.
त्वचेच्या आरोग्यासाठी उत्तम – यात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे (A, C) भरपूर प्रमाणात असल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते.
पचनासाठी उपयुक्त – कलिंगडातील नैसर्गिक फायबर पचन सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.
हेही वाचा: Pune: धक्कादायक! शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचाराचा थरार
खरबूजचे फायदे
शरीराला ऊर्जा देते – खरबूजमध्ये नैसर्गिक साखर आणि जीवनसत्त्वे असल्याने ते शरीराला ऊर्जा देणारे फळ आहे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले – यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन A असते, जे दृष्टी सुधारण्यास मदत करते.
हाडांसाठी फायदेशीर – यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे बळकट राहतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते – व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्समुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पचन सुधारते – खरबूज पचनसंस्थेस मदत करते आणि अन्नपचन क्रिया सुलभ करते.
कोणते अधिक फायदेशीर?
कलिंगड आणि खरबूज दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. जर तुम्हाला हायड्रेशन आणि वजन नियंत्रण हवे असेल तर कलिंगड अधिक फायदेशीर ठरू शकते. तर दुसरीकडे, शरीराला पोषण आणि ऊर्जा मिळवण्यासाठी खरबूज उत्तम पर्याय आहे. त्यामुळे गरजेनुसार दोन्ही फळांचा आहारात समावेश करणे हितावह ठरेल.