Pumpkin Seeds Benefits: बाजारात आपल्याला सहज भोपळा मिळतो, पण त्याच्या बियांचे महत्त्व अनेकांना ठाऊक नसते. या छोट्या बियांमध्ये पोषणाचा असा खजिना दडलेला आहे की त्या दैनंदिन आहाराचा भाग केल्यास हृदय, मधुमेह, पचनसंस्था आणि झोप या सर्व गोष्टींवर चांगला परिणाम होतो.
भोपळ्याच्या बियांमध्ये कोणते पोषक घटक असतात?
भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. त्याचबरोबर फायबर आणि निरोगी फॅट्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. या बियांमधील चांगले फॅट्स वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
हेही वाचा - Vitamin B12 Deficiency: व्हिटॅमिन बी 12च्या कमतरतेमुळे 'या' समस्या जाणवतात, जाणून घ्या
भोपळ्याच्या बिया कशा खाव्यात?
स्मूदी, दही किंवा ओट्समध्ये मिसळून
सॅलड किंवा सूपवर गार्निश करून देखील तुम्ही भोपळ्याच्या बिया खाऊ शकता.
नाश्याला या बिया भाजून खाऊ शकता.
कुकीज किंवा ब्रेडमध्ये बेक करून
भोपळ्याच्या बिया अंकुरीत करून देखील तुम्ही त्याचे सेवन करू शकता.
मधुमेहासाठी उपयुक्त
भोपळ्याच्या बिया रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्या इन्सुलिनची पातळी संतुलित करण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी या बिया विशेषतः फायदेशीर आहेत. या बियांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट्स असतात जे शरीराच्या पेशींचे नुकसान टाळतात आणि जळजळ कमी करतात. संशोधनानुसार, भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन केल्यास काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो.
हेही वाचा - Clove and Garlic Water: लवंग-लसूण पाण्याचे गुपित; छोटासा उपाय, मोठे आरोग्य फायदे
झोप सुधारण्यासाठी उपाय
भोपळ्याच्या बियामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि ट्रिप्टोफॅन मनाला शांत ठेवतात व गाढ झोप आणतात. त्यामुळे निद्रानाशाने त्रस्त असणाऱ्यांसाठी या बिया नैसर्गिक उपाय ठरू शकतात. एकंदरीत, भोपळ्याच्या बिया लहान असल्या तरी त्यांचे फायदे मोठे आहेत. त्या आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास तुम्ही शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकता आणि निरोगी जीवन जगू शकता.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)