Monday, September 01, 2025 10:46:00 AM

LPG Gas Cylinder Rate: दिलासादायक! एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला; आजपासून नवीन किंमत लागू

तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 51.50 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे दिल्लीत या सिलेंडरची नवी किंमत आता 1580 इतकी असेल.

lpg gas cylinder rate दिलासादायक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आजपासून नवीन किंमत लागू

LPG Gas Cylinder Rate: आजपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 51.50 रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे दिल्लीत या सिलेंडरची नवी किंमत आता 1580 इतकी असेल. जुलै महिन्यात 58.50 रुपये तर ऑगस्टमध्ये 33.50 रुपयांची कपात झाल्यानंतर सलग तिसऱ्यांदा व्यावसायिक सिलेंडर स्वस्त झाला आहे.

घरगुती ग्राहकांना दिलासा नाही

घरगुती ग्राहकांना मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही. सध्या दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत 853 आहे. गेल्या दशकात घरगुती एलपीजी कनेक्शनची संख्या दुप्पट झाली असून एप्रिल 2025 पर्यंत ती सुमारे 33 कोटींवर पोहोचली आहे. 

हेही वाचा - Bank Holidays in September 2025: सप्टेंबरमध्ये बँकांना तब्बल 15 सुट्ट्या; जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

रेस्टॉरंट्स व व्यावसायिकांना फायदा

या कपातीचा थेट फायदा रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापनांना होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि इतर परिस्थिती लक्षात घेऊन दरमहा गॅस दरांचा आढावा घेण्यात येतो.

हेही वाचा - Gold Rate Today : सोन्याचा भाव काही कमी होईना ! झाली इतकी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी मोठी मदत

दरम्यान, मोदी सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी प्रति सिलेंडर 300 अनुदान जाहीर केले आहे. ही सबसिडी 2025-26 या वर्षासाठी लागू असेल आणि जास्तीत जास्त 8 वेळा (रिफिल) मिळणार आहे. 5 किलो सिलेंडर घेणाऱ्यांना ही सबसिडी प्रमाणानुसार लागू असेल. देशभरात आतापर्यंत 10.33 कोटींहून अधिक उज्ज्वला सिलेंडर वितरित करण्यात आले आहेत.


सम्बन्धित सामग्री