Wednesday, August 20, 2025 12:35:48 PM

मूळव्याध होण्याची कारणे काय, यावर कोणते घरगुती उपाय केले जाऊ शकतात?

बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. यावर काय घरगुती उपाय केले जाऊ शकतात. जाणून घेऊयात...

मूळव्याध होण्याची कारणे काय यावर कोणते घरगुती उपाय केले जाऊ शकतात

How To Relief In Hemorrhoids: बद्धकोष्ठता- शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते. व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे अपचन अशा अनेक बाबींमुळे मुळव्याधाचा धोका निर्माण होतो. 

मूळव्याधाची कारणे काय?

1. बद्धकोष्ठता - पोट साफ न होणे.
2. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे. 
३. गर्भधारणेदरम्यान - गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे  बद्धकोष्ठता होते. 
4. प्रसूतीनंतर - प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. 
५. चुकीची आहार पद्धती - फास्ट फूड व कमी फायबरयुक्त आहाराचे सेवन 
६. बराच काळ एका जागी बसून राहणे. 
७. लिवर सिरोसीससारख्या आजारामुळे.
 ८. अनुवंशिकता.
 ९. अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा: कायदेशीर अडचणींमुळे आणिक आगारात 100 मिनी बस धुळखात

मूळव्याधाची लक्षणे -

शौच विधीच्या वेळेस वेदना, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना

शौच विधीच्या वेळेस लाल रंगाचे रक्त पडणे

गुदभागी कोंब,मोड,कुडी,गाठ येणे.

पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.

अ‍ॅनिमिया- मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते, या अवस्थेला अ‍ॅनिमिया असे म्हणतात.

भूक मंदावणे – शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो. या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लागतो. परंतु याचा तोटा जास्त होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते. तसेच मुळव्याधीचा त्रासही वाढतो.

रुग्णाचे वजन कमी होते.

मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.

मूळव्याधावरती घरगुती उपचार -

हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते. दही, ताक याचा वापर करणे, रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते. हा रोग अनेक दिवस लपविला जातो. त्यामुळे तो वाढल्यावर लोकं उपचारासाठी धावतात. अ‍ॅलोपॅथीमध्ये शस्त्रक्रिया हा उपचार आहे.
 


सम्बन्धित सामग्री