Wednesday, September 03, 2025 09:49:46 PM

नखं काढण्यासाठी शुभ वार कोणता? जाणून घ्या योग्य वेळ आणि शास्त्रानुसार नियम

हिंदू धर्मात प्रत्येक कृतीसाठी एक विशिष्ट शुभ वेळ आणि वार सांगितले गेले आहेत. अगदी केस कापण्यापासून ते नखं काढण्यापर्यंत देखील शास्त्रानुसार योग्य वेळ निश्चित केली जाते.

नखं काढण्यासाठी शुभ वार कोणता जाणून घ्या योग्य वेळ आणि शास्त्रानुसार नियम

हिंदू धर्मात प्रत्येक कृतीसाठी एक विशिष्ट शुभ वेळ आणि वार सांगितले गेले आहेत. अगदी केस कापण्यापासून ते नखं काढण्यापर्यंत देखील शास्त्रानुसार योग्य वेळ निश्चित केली जाते. काही लोक नखं कधीही कापतात, परंतु शास्त्रांमध्ये त्यासाठी विशिष्ट नियम आहेत. योग्य वेळी नखं काढल्याने शुभ परिणाम मिळतात, तर चुकीच्या वेळी नखं काढल्यास त्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात.

कधी काढू नखं?
शास्त्रानुसार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी नखं काढणे टाळावे.

हेही: सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना घर बांधून देण्याची जबाबदारी आता शिवसेनेची

मंगळवार – हा दिवस मंगळ ग्रहाचा असल्याने या दिवशी नखं काढल्यास अपयश आणि आरोग्यविषयक त्रास संभवतो.
गुरुवार – हा दिवस गुरु ग्रहाचा असल्याने या दिवशी नखं काढल्यास बुद्धी मंदावते आणि गुरु ग्रहाचे अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात.
शनिवार – शनिदेवाचे प्रभाव असलेल्या या दिवशी नखं काढल्यास दारिद्र्य आणि अडचणी निर्माण होतात, असे मानले जाते.

शुभ वार कोणते?
सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार हे नखं काढण्यासाठी शुभ मानले जातात.

सोमवार – या दिवशी नखं काढल्यास मानसिक शांती मिळते आणि चांगले आरोग्य प्राप्त होते.
बुधवार – हा बुध ग्रहाचा दिवस असल्याने बुधवारी नखं काढल्यास व्यापार आणि नोकरीत यश मिळते.
शुक्रवार – या दिवशी नखं काढल्यास सौंदर्य आणि आरोग्य सुधारते.
रविवार – काही शास्त्रांमध्ये रविवार नखं काढण्यासाठी योग्य मानला जातो, विशेषतः स्वच्छता आणि आरोग्यासाठी.

कधी कधी नखं काढू नयेत?
संध्याकाळी किंवा रात्री नखं काढू नयेत, कारण हे अशुभ मानले जाते.
अमावस्या, पूर्णिमा आणि ग्रहणाच्या दिवशी नखं काढणे टाळावे.

नखं काढताना घ्यावयाची काळजी
नखं कापल्यानंतर त्यांना इतरत्र फेकू नये, कारण ते अशुद्ध मानले जाते.
स्वच्छतेच्या दृष्टीने नखं वेळच्या वेळी कापणे आवश्यक आहे.
या शास्त्रीय माहितीच्या आधारे योग्य वेळी नखं कापून शुभ फल प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा.

Disclaimer: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही. 


सम्बन्धित सामग्री