Thursday, September 04, 2025 02:25:30 AM

नेमकं कोणत्या कारणांमुळे भारतीयांना कोरियन खाद्यपदार्थ जास्त आवडतात? पाहाच

कोरियन ड्रामामध्ये जे काही पदार्थ दाखवले जाते किंवा खाल्ले जाते, त्यामुळे जगभरातील के-ड्रामा पाहणाऱ्या चाहत्यांनीसुद्धा तेथील खाद्यपदार्थ खाण्यास सुरुवात केले.

नेमकं कोणत्या कारणांमुळे भारतीयांना कोरियन खाद्यपदार्थ जास्त आवडतात पाहाच

कोरियन पॉप कलचर (K-Pop Culture) ने संपूर्ण जगाला आकर्षित केले आहे. बीटीएसपासून ते ब्लॅकपिंकपर्यंत, आताची तरुण पिढी के-पॉप स्टार्सचे मोठे चाहते आहेत. तेथील कोरियन कलाकार जे काही करतात किंवा खातात ते सर्वकाही व्हायरल होते. कोरियन ड्रामामध्ये जे काही पदार्थ दाखवले जाते किंवा खाल्ले जाते, त्यामुळे जगभरातील के-ड्रामा पाहणाऱ्या चाहत्यांनीसुद्धा तेथील खाद्यपदार्थ खाण्यास सुरुवात केले. हे खाद्यपदार्थ तिखट आणि चविष्ठ असल्यामुळे जगभरातून अनेकांना कोरियन खाद्यपदार्थ खूप आवडतात. त्यामुळे, जगभरासह भारतातदेखील कोरियन खाद्यपदार्थ अधिक लोकप्रय होत आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया. 


1. किंबाप (Kimbap):

किंबाप (Kimbap) हा पदार्थ दिसायला सुशीसारखाच असतो, पण सुशीपेक्षा वेगळा असतो. किंबापमध्ये (Kimbap) शिजवलेला भात, भाज्या, अंडी, मासे किंवा चिकन यांसारख्या विविध गोष्टींना एकत्र करून समुद्री गवताच्या (Seaweed) पत्र्यात गुंडाळले जाते. भारतीयांना मसालेदार आणि वेगवेगळ्या चवींनी असलेले पदार्थ आवडतात. म्हणून किंबाप (Kimbap) हा पदार्थ भारतीयांसाठी एक उत्तम पर्याय ठरतो.


2. रॅम्युन (Ramyeon):

रॅम्युन (Ramyeon) हे पदार्थ कोरियन इंस्टंट नूडल्स आहे. त्याची चव तिखट आणि उष्ण असते. भारतीयांना तिखट पदार्थ अधिक प्रिय असल्यामुळे रॅम्युन (Ramyeon) खूप लोकप्रिय आहे.यामध्ये, काही प्रकारात मसालेदार सूप, भाज्या आणि मांस यांचा समावेशही असतो.


3. टॉपोकी (Tteokbokki):

टॉपोकी (Tteokbokki) हे एक पारंपरिक कोरियन स्ट्रीट फूड आहे. यामध्ये तांदळाच्या केकला (Rice Cakes) गोडसर आणि तिखट गोजुजंग (Gochujang – लाल मिरची पेस्ट) सॉससोबत शिजवले जाते. हे खाद्य तिखट आणि मसालेदार असल्यामुळे भारतीयांना याची चव खूप आवडते आणि त्यामुळे टॉपोकी (Tteokbokki) भारतात लोकप्रिय होत आहे.


4. कोरियन फ्राइड चिकन (Korean Fried Chicken):

कोरियन फ्राइड चिकन (Korean Fried Chicken) पारंपरिक भारतीय चिकन फ्रायच्या तुलनेत अधिक कुरकुरीत असते आणि ते गोडसर-तिखट सॉसने भरलेले असते. कोरियन फ्राइड चिकनच्या (Korean Fried Chicken) विविध प्रकारांमुळे भारतीय लोकांना वेगवेगळ्या चवींचा अनुभव घेता येतो. ज्यामुळे ते लोकप्रिय होत आहे. 

 

5. जापचे (Japchae):

जापचे (Japchae) हा एकप्रकारचे नूडल खाद्यपदार्थ आहे. हे खाद्यपदार्थ गोडसर आणि चविष्ट असते. जापचे (Japchae) बनवण्यासाठी गाजर, पालक, मशरूम, कांदा आणि गोडसर-सोया सॉस वापरला जातो. हा पदार्थ हलका पण स्वादिष्ट पर्याय असल्यामुळे भारतीयांमध्येही लोकप्रिय होत आहे.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री