Wednesday, August 20, 2025 02:05:06 PM

फळ विक्रेते फळांना पेपरमध्ये का ठेवतात?

जेव्हा तुम्ही बाजारात जाता, तेव्हा तुम्ही बघाल फळविक्रेते फळांना पेपरमध्ये पॅक करून ठेवतात. पण तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच पडला असेल आणि ते म्हणजे फळांना कागदांमध्ये का पॅक करून ठेवतात? जाणून घ्या.

फळ विक्रेते फळांना पेपरमध्ये का ठेवतात

आपल्या शरीराला निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. काहीजण योगा, व्यायाम करतात तर काहीजण फळांचे, हिरव्या भाज्यांचे नियमित सेवन करतात. ज्यामुळे तुम्ही आजारांवर सहज मात करू शकता. फळांमध्ये आणि हिरव्या भाज्यांमध्ये असलेल्या प्रोटीन, व्हिटॅमिन्समुळे शरीरात रक्ताचे प्रमाण तर वाढते. त्यामुळे डॉक्टर्स सफरचंद, केळी, किवी, अननस आणि त्यासोबत ब्रोकोली, पालक, यांसारख्या हिरव्या भाज्यादेखील खाण्यास सल्ला देतात. सध्या उन्हाळा सुरु होणार असल्यामुळे कलिंगड, संत्री, सफरचंद, पपई, पेरू, आणि द्राक्षे अश्या अनेक हंगामी फळांची बाजारात मोठ्या प्रमाणांत मागणी असते. पण जेव्हा तुम्ही बाजारात जाता, तेव्हा तुम्ही बघाल फळविक्रेते फळांना पेपरमध्ये पॅक करून ठेवतात. पण तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच पडला असेल आणि ते म्हणजे फळांना कागदांमध्ये का पॅक करून ठेवतात? चला तर यामागचे कारण आपण जाणून घेऊयात. 

या कारणांमुळे फळांना ठेवतात पेपरमध्ये:

बाजारात फळ आणि भाज्या खरेदी करताना तुम्ही एक गोष्ट नक्कीच बघितली असाल. फळविक्रेते आपल्या फळांना कागदांमध्ये पॅक करून ठेवतात. याचे कारण म्हणजे पेपर हे इन्सुलेटरचे काम करते, ज्यामुळे फळे उष्ण तापमानात खराब होण्यापासून रोखते. फळांना कागदांत पॅक केल्यामुळे ते जास्त काळ टिकते. इतकेच नाही तर कागदे फळांना किडे, आणि जंतूंपासून संरक्षण करते. कधीकधी फळांना उन्हात ठेवल्यामुळे ते खराबदेखील होऊ शकतात. पिकलेल्या फळांना पेपरमध्ये पॅक करून ठेवल्यावर ते लवकर खराब होत नाही. पिकलेल्या फळांपैकी जर एखादे फळ खराब झालेच तर हेच पेपर दुसऱ्या फळांना खराब होऊ देत नाही. ज्यामुळे अनेक फळ खराब होण्यापासून वाचते. अनेकदा फळ कच्चे आहे किंवा पिकले हे बघण्यासाठी फळविक्रेते फळांमध्ये नखाने टोचून बघतात. तेव्हा या पेपरमुळे त्या फळांचे संरक्षण होते. त्यामुळेच फळविक्रेते फळांना पपेरमध्ये पॅक करण्याचा निर्णय घेतात. 
          बऱ्याचदा फळे कच्चे असतात. त्यामुळे फळांना कागदांमध्ये पॅक केल्यामुळे ते नैसर्गिक पद्धतीने पिकते. बऱ्याचदा लोक कच्ची फळे घेण्यास टाळतात. त्यामुळे फळविक्रेते पेरू, पपई, संत्री, आंबे, यांसारख्या फळांना कागदांमध्ये ठेवतात. ज्यामुळे फळे लवकर पिकते. त्यासोबतच कागद ओलावा लवकर शोषून घेते, ज्यामुळे फळे अधिक काळ टिकते. वाहतुकीदरम्यान फळे खराब होऊ नये आणि जास्त काळ राहावे यासाठी देखील फळांना कागदांत पॅक करून ठेवतात. 


सम्बन्धित सामग्री