'तुम्ही किती दिवस जिवंत राहाल' किंवा 'तुमचे आयुष्य किती असेल' हे असे प्रश्न कधीना कधी नक्कीच आपल्या मनात येतात. काहीजण या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्नही करतात. परंतु तुम्हाला माहितीय का? तुमच्या नखांवरून सुद्धा समजत की तुम्ही किती वर्ष जगाल. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात, वयावर अभ्यास करणाऱ्या हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डेविड सिंक्लेयर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेय. तुमच्या नखांकडे पाहूनही तुम्ही किती आयुष्य जगणार आहात याचा अंदाज लावता येऊ शकतो. होय, हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डेविड सिंक्लेयर यांच्या मते, तुमचे जैविक वय आणि नखांच्या वाढीमध्ये एक संबंध आहे.
नखांची वाढ उघड करते आयुष्याचे रहस्य
जेनेटिक्स एक्सपर्ट डॉ. डेविड सिंक्लेयर यांच्या मते, तुमच्या नखांचे आरोग्य हे तुमच्या शरीरात नवीन पेशी किती वेगाने तयार होत आहेत याबद्दल संकेत देते. ही प्रक्रिया जेवढ्या वेगाने होते, तितक्याच संथ गतीने तुमचे वय वाढते.
त्यांनी त्यांच्या पॉडकास्ट ‘लाइफस्पॅन’ मध्ये सांगितले आहे की, तुम्ही नखांच्या वाढीवरून तुमच्या आयुष्याचा अंदाज लावू शकतात. जर तुमची नखे जलद गतीने वाढत असतील, तर याचा अर्थ तुमचे जैविक वय संथ गतीने वाढत आहे, म्हणजेच तुम्ही दीर्घायुषी असण्याची शक्यता आहे. पण जर तुमच्या नखांची वाढ खूप मंद असेल, तर हे तुमचे वय वेगाने वाढत असल्याचे संकेत देते.
नखांची वाढ इतर अनेक गोष्टींवरही अवलंबून असते. अनेकदा वयाशिवाय खराब आहारामुळे नखांना आवश्यक पोषण मिळत नाही, ज्यामुळे त्यांच्या वाढीवर परिणाम होतो. याशिवाय, पौगंडावस्था (प्युबर्टी) आणि गर्भधारणेदरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्याचा प्रभाव नखांच्या वाढीवर पडू शकतो. असं देखील संशोधनातून समोर आलंय.
Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.