न भूतो, न भविष्यति, रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती. संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त उत्साह पाहायला मिळतोय. शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून यानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आकर्षक अशी सजावट करण्यात आलीय. संपूर्ण किल्ल्याला फुलांनी सजवण्यात आलेय. शिवाजी महाराजांच्या पाळण्याला देखील आकर्षक अशी सजावट करण्यात आलीय. शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात आहे. हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान आहे.
हेही वाचा: तुळजापूर ड्रग्ज रॅकेटचं मुंबई कनेक्शन?
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास:
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सहाव्या शतकातील आहे.
सुरुवातीला मौर्य आणि नंतर चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादवांचे राज्य होते.
१३व्या शतकात हा किल्ला दिल्ली सल्तनतच्या ताब्यात आला.
भारत सरकारने 26 मे, इ.स. 1909 रोजी या किल्ल्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले.
शिवनेरी किल्ल्याची वैशिष्ट्ये:
हा किल्ला जुन्नर शहराकडे पाहणाऱ्या टेकडीवर वसलेला आहे.
किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.
किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे.
किल्ल्यावर पोहोचण्यासाठी अवघे सात दरवाजे आहेत.
किल्ला आणि त्याच्या सभोवतालचा परिसर दिवसभराच्या ट्रेकसाठी एक अद्भुत आणि खडकाळ ठिकाण आहे.
दरम्यान शिवनेरीवर शिवजन्मोत्सवा निमित्त उत्साह पाहायला मिळत असून किल्ल्याच्या पायथ्याशी फटाक्यांची आतिषभाजी करत जल्लोष करण्यात येत असून काल रात्रीपासूनच अनेक शिवभक्त मशाली घेऊन शिवनेरीवर दाखल झाले आहे. किल्ले शिवनेरीवरच्या या शिवजन्मोत्सव कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेदेखील उपस्थित राहणार आहेत.