Wednesday, August 20, 2025 11:58:01 AM

Vasai-Virar Tragedy: वसईतील धुमाळ नगरमध्ये विहिरीत पोहताना 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

मासूम सकाळी विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहताना त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. त्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही.

vasai-virar tragedy वसईतील धुमाळ नगरमध्ये विहिरीत पोहताना 17 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

पालघर: वसईतील धुमाळ नगर येथील स्मशानभूमीजवळील विहिरीत पोहताना एका 17 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली. मृत मुलाचे नाव मासूम समसुल खान असे आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. मासून हा वसईत राहणाऱ्या खाजगी कंपनीत काम करणाऱ्या जिनात समसुल खान यांचा मुलगा होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मासूम सकाळी विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पोहताना त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. त्यामुळे त्याला बाहेर येता आले नाही. आसपासच्या लोकांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु अपयश आल्याने अग्निशमन दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून शोधकार्य सुरू केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर त्यांनी मासूमचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

हेही वाचा - Khed Accident: खेडमधील अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर

शोधकार्य पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नालासोपारा (पूर्व) येथील तुलिंज येथील नागनाथ महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आला. सकाळी 9:50 वाजता डॉक्टरांनी तपासणी करून मासूमला मृत घोषित केले. प्राथमिक अहवालानुसार, मृत्यूचे कारण बुडल्यामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा - Dahi Handi Festival 2025: दहीहंडी सरावादरम्यान 11 वर्षीय गोविंदाचा उंचीवरून पडून मृत्यू

पोलिसांची कारवाई - 

या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 194 अंतर्गत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज चौधरी पुढील तपास करत आहेत. या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरातील नागरिकांनी तरुणांनी विहिरीत किंवा धोकादायक जलाशयांमध्ये पोहताना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, अशा ठिकाणी सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात येत आहे. 
 


सम्बन्धित सामग्री