Wednesday, August 20, 2025 04:31:37 AM

Chhtrapati Sambhajinagar: टोमॅटोचा सर्वाधिक दर, पैठणच्या खादगांव येथील शेतकऱ्याला लागली लॉटरी

लॉटरीद्वारे श्रीमंत होण्याची गोष्ट तुम्ही अनेकदा ऐकली असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत, ज्याने पिकांची लॉटरी जिंकून श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

chhtrapati sambhajinagar टोमॅटोचा सर्वाधिक दर पैठणच्या खादगांव येथील शेतकऱ्याला लागली लॉटरी

विजय चिडे. प्रतिनिधी. छत्रपती संभाजीनगर: लॉटरीद्वारे श्रीमंत होण्याची गोष्ट तुम्ही अनेकदा ऐकली असेल. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहोत, ज्याने पिकांची लॉटरी जिंकून श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या खादगाव येथील शेतकरी गणेश सर्जेराव काकडे यांना टोमॅटोच्या पीकातून दररोज चांगला नफा मिळत आहे. केवळ एक एकरच्या शेतात टोमॅटोची शेती करून 8 लाख रूपयांचा नफा या शेतकऱ्याला मिळणार आहे. 

हेही वाचा: Nagpur Crime : 'लुटेरी दुल्हन'कडून 8 पेक्षा अधिक नवरदेवांची फसवणूक, खोटारड्या नवरीचा पर्दाफाश

साधारणपणे शेती करणे हा तोट्याचा व्यवसाय मानला जातो. पीक चांगले आले तरी भाव कमी मिळाला तर रस्त्यावर फेकून द्यावे लागते. पण पैठण तालुक्यातील शेतकरी गणेश काकडे यांनी दोन महिन्यांपूर्वी एक एकर टोमॅटोची लागवड केली होती. मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठा फरबदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे पालेभाज्यासह टोमॅटो पिकाला देखील याचा मोठा फटका सहन करावा लागला होता. मात्र, शेतकरी गणेश काकडे यांच्या शेतात चांंगल्या प्रकारचे टोमॅटो आहेत. त्याचबरोबर, टोमॅटोला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी गणेश काकडेंना लाखो रुपयांचा फायदा झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या या बाजारपेठेमध्ये त्यांच्या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

मागच्या महिन्यापासून टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे, सामान्यांच्या जेवणातून टोमॅटो हद्दपार झाला आहे. अशातच, टोमॅटोचे भाव प्रचंड वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी टोमॅटोला भाव न मिळाल्याने खराब होणारे टोमॅटो आता 60 ते 80 रुपये किलो झाले आहेत. टोमॅटोचे दर गगनाला भिडल्यामुळे टोमॅटो घेणे अनेकांना परवडत नाही. मात्र, भाव वाढल्याने टोमॅटोची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही चांगली संधी ठरली आहे. अशातच, शेतकरी गणेश काकडे हे टोमॅटो विकून लखपती झाले आहेत.


सम्बन्धित सामग्री