Tukaram Omble Memorial: महाराष्ट्र सरकारने 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले मुंबई पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या सन्मानार्थ एक भव्य स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बांधकाम कामासाठी 13.46 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या मंजूर रकमेचा पहिला हप्ता, 2.70 कोटी रुपये (20%) शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर आता लवकरचं स्मारकाचे काम सुरू होणार आहे.
साताऱ्यातील मूळ गावी बांधण्यात येणार स्मारक -
हे स्मारक तुकाराम ओंबळे यांच्या सातारा जिल्ह्यातील केडांबे या मूळ गावी बांधले जाईल. निधी मंजूर झाल्यानंतर स्मारकाचे काम लवकरच सुरू होईल. तुकाराम ओंबळे यांचे हौतात्म्य पिढ्या न पिढ्या लोकांना आठवावे, यासाठी त्यांचे हे भव्य स्मारक बांधण्यात येणार असल्याचं महायुती सरकारने म्हटलं आहे.
हेही वाचा - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर; प्रत्यक्षदर्शीने A to Z सगळंच सांगितलं
तुकाराम ओंबळेंनी कसाबला जिवंत पकडलं-
तुकाराम ओंबळे हे तेच पोलीस अधिकारी होते ज्यांनी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, ज्यामुळे मुंबईतील अनेक लोकांचे प्राण वाचू शकले. तुकाराम ओंबळे यांच्या शौर्यामुळे कसाब आणि इस्माईल खान यांना गिरगाव चौपाटीजवळ रोखण्यात आले. अन्यता मुंबईतील आणखी लोकांचे प्राण गेले असते. तुकाराम यांनी कसाबची रायफल इतकी घट्ट धरली होती की तो ती फिरवूही शकत नव्हता. ज्यामुळे त्याला जिवंत पकडण्यात आले. पण त्या काळात कसाबने तुकारामवर 23 गोळ्या झाडल्या, पण तुकाराम यांनी त्याची बंदूकही हलू दिली नाही. ज्यामुळे ते शहीद झाले.
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला -
मुंबईमध्ये 26/11 च्या रात्री, पाकिस्तानातून दहा दहशतवादी समुद्रमार्गे शहरात घुसले. प्रथम त्यांनी सीएसटी रेल्वे स्टेशनला लक्ष्य केले, त्यानंतर कसाब आणि त्याचा साथीदार इस्माईल खान यांनी कामा हॉस्पिटलला आपले लक्ष्य बनवले. दोन्ही दहशतवादी रुग्णालयाच्या मागील दाराने पोहोचले, परंतु रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आतून सर्व दरवाजे बंद केले होते. यानंतर, दोघांनीही बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिस पथकावर हल्ला केला, ज्यामध्ये एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह 6 पोलिस शहीद झाले.
हेही वाचा - रिक्षा चालकाची दहशत! लोखंडी रॉडने फोडली गाडीची काच, कोरेगाव भीमा पुलावर घटना
कसाबला जिवंत पकडण्यात आलं -
दरम्यान, कसाब आणि इस्माईल खान यांनी पोलिसांची गाडी गिरगाव चौपाटीकडे नेली, जिथे बॅरिकेडिंग दरम्यान हवालदार तुकाराम ओंबळे यांनी त्यांची गाडी थांबवली आणि कसाबची बंदूक जप्त केली. मात्र, या हल्ल्यात तुकाराम ओंबळे यांना आपला जीव गमवावा लागला.