Wednesday, August 20, 2025 09:19:27 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ईश्वरी भिसे कुटुंबीयांचा पोलिसांत जबाब नोंद

पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे, आणि ईश्वरी उर्फ तनिषा सुशांत भिसे यांचा वेळीच उपचार न झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर ईश्वरी भिसे कुटुंबीयांचा पोलिसांत जबाब नोंद

पुणे: पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे, आणि ईश्वरी उर्फ तनिषा सुशांत भिसे यांचा वेळीच उपचार न झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या धक्कादायक घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाविरुद्ध संतापाची लाट उसळली असून, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी निषेध नोंदवला आहे.

 

भिसे कुटुंब आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट:

शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असताना, त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. त्यानंतर, त्यांनी यावर कारवाईचे संकेत दिले. यादरम्यान, मृत महिलेच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आणि न्यायाची मागणी केली.

 

हा लढा संपूर्ण जनतेचा आहे:

ईश्वरी उर्फ तनिषा भिसे यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले, 'ही लढाई आता केवळ भिसे कुटुंबीयांची राहिली नसून संपूर्ण जनतेची लढाई आहे. फक्त एका डॉक्टरवर किंवा एखाद्या व्यक्तीवर नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर रोष आहे. इथून पुढे भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, यासाठी योग्य वेळी कठोर पावले उचललीच पाहिजेत,' असे त्यांनी सांगितले.

 

15 राजकीय पक्ष आणि संघटनांनी रुग्णालयाबाहेर आंदोलन केले:

या घटनेविरोधात शुक्रवारी, 15 राजकीय पक्ष आणि संघटनांनी एकत्र येऊन रुग्णालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. यादरम्यान, भाजप महिला आघाडीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत हॉस्पिटलमध्ये काही प्रमाणात तोडफोड केली.

 

सर्वांचे लक्ष लागले प्रशासनाकडे:

या घटनेनंतर, प्रशासनाकडून कोणती कारवाई केली जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत जनतेमध्येही मोठी चर्चा सुरू असून, वैद्यकीय क्षेत्रात जबाबदारी आणि पारदर्शकतेची मागणी अधिक तीव्र होत आहे.


सम्बन्धित सामग्री