Monday, September 01, 2025 12:20:25 PM

Apple Store in Pune: मुंबई-दिल्लीनंतर आता पुण्यात सुरू होणार अ‍ॅपलचे स्टोअर; कोणत्या सेवा उपलब्ध असतील? जाणून घ्या

कंपनीने जाहीर केले आहे की 2 सप्टेंबरला बंगळुरूमध्ये आणि 4 सप्टेंबरला पुण्यात अधिकृत अॅपल स्टोअर सुरू होणार आहे. यामुळे अॅपलची भारतासाठी असलेली मोठी योजना स्पष्ट होते.

apple store in pune मुंबई-दिल्लीनंतर आता पुण्यात सुरू होणार अ‍ॅपलचे स्टोअर कोणत्या सेवा उपलब्ध असतील जाणून घ्या

Apple Store in Pune: अॅपल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि दिल्लीमध्ये स्टोअर उघडल्यानंतर अॅपल आता भारतातील इतर मोठ्या शहरांमध्ये पाऊल ठेवत आहे. कंपनीने जाहीर केले आहे की 2 सप्टेंबरला बंगळुरूमध्ये आणि 4 सप्टेंबरला पुण्यात अधिकृत अॅपल स्टोअर सुरू होणार आहे. यामुळे अॅपलची भारतासाठी असलेली मोठी योजना स्पष्ट होते.

कोरेगाव पार्कमध्ये सुरू होणार अॅपल स्टोअर - 

पुण्यातील सर्वात पॉश भागात असलेले हे स्टोअर फक्त मोबाईल खरेदीसाठी नसून एक अनुभव केंद्र असेल. येथे ग्राहकांना अॅपल डिव्हाइसेसचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. स्टोअरमध्ये अॅपलचे ट्रेंड एक्सपर्ट्स आणि क्रिएटिव्ह स्पेशॅलिस्ट्स असतील जे ग्राहकांना योग्य उत्पादन निवडण्यास मार्गदर्शन करतील.

हेही वाचा - WhatsApp Wedding Card Scam: 'लग्नाला नक्की या' असा छोटासा मेसेज, क्लिक करताच गायब झाले लाखो रुपये

मोफत वर्कशॉप्स - 
 
दरम्यान, Today at Apple या उपक्रमांतर्गत फोटोग्राफी, संगीत, कोडिंग आणि आर्टशी संबंधित सेशन्स ग्राहकांना मोफत दिले जातील. तथापी, आयफोन, आयपॅड, मॅकबुक, वॉच आणि अॅक्सेसरीजसह सर्व उत्पादने एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. अॅपल डिव्हाइसेसच्या समस्यांसाठी थेट तज्ञांची मदत मिळणार आहे.

हेही वाचा - Airtel Down: एअरटेलची सेवा पुन्हा ठप्प! 'या' शहरातील वापरकर्त्यांना करावा लागतोय समस्यांचा सामना

अॅपलचे ‘मिशन इंडिया’ धोरण - 

भारतात स्टोअर्स उघडणे ही केवळ मार्केटिंग स्ट्रॅटेजी नसून मोठ्या उत्पादन धोरणाचा भाग आहे. अॅपलने अलीकडेच जाहीर केले की आगामी iPhone 17 मालिका थेट भारतात तयार केली जाणार आहे. त्यामुळे Made in India आयफोन्सना आंतरराष्ट्रीय बाजारात अधिक ओळख मिळणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री