अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादमध्ये गुरुवारी दुपारी विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेत विमानातील 241 प्रवासी मृत्यूमुखी पडले. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या या विमानातून 169 भारतीय नागरीक, 53 ब्रिटीश नागरिकांसह एकूण 242 प्रवासी प्रवास करत होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता उड्डाण केलेलं हे विमान अवघ्या काही मिनिटांतच विमानतळाजवळील मेघानीनगर परिसरात कोसळलं अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील हीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मैथिली मागील दोन वर्षांपासून एअर इंडियामधील 'क्रू मेंबर'मध्ये इअर होस्टेज म्हणून कार्यरत होती. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी न्हावे येथे मैथिली पाटीलच्या वडिलांची आणि कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.
हेही वाचा : AMBANI ON PLANE CRASH: विमान अपघाताचा संपूर्ण रिलायन्स कुटुंबाला दुःख
विमान दुर्घटनेत नवी मुंबईच्या मैथिली पाटीलचा मृत्यू
अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेल तालुक्यातील मैथिलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी दुपारी कुटुंबासोबत जेवण केले आणि गुरुवारी सकाळी आईला विमानातून शेवटचा संपर्क केला. अहमदाबाद विमान दुर्घटनेत पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटील हीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून मैथिलीचे संपूर्ण कुटुंब अहमदाबादला रवाना झाले आहेत. मैथिली मागील दोन वर्षांपासून एअर इंडियामधील क्रू मेंबरमध्ये एअर होस्टेज म्हणून कार्यरत होती. मैथीलीची ड्युटी अपघात झालेल्या अहमदाबाद लंडन विमानातच असल्याने ती बुधवारी दुपारी एक वाजता आपल्या कुटुंबासोबत मैथिलीने दुपारचे जेवण केले आणि घरातून निघाली, त्यानंतर गुरवारी सकाळी 11 वाजता घरातल्या आई वडिलांशी तिने शेवटचा संपर्क केला. न्हावामधून निघालेली मैथिली मुंबई विमानतळावरून अहमदाबाद विमानतळावर जाऊन याच विमानात दाखल झाली आणि काही काळातच ही दूर गेली.