पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सात वर्षे झाले मात्र अध्यक्ष नाहीत. सदस्यही तेच आहेत. त्यामुळे भाविक भक्तांना सोयी सुविधा नीट मिळत नसल्याने नूतन मंदिर समितीची नियुक्ती करावी अशी मागणी मराठा महासंघाच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी नूतन समिती अस्तित्वात यावी म्हणून संत नामदेव महाराजांना साकडेही घालण्यात आले. सध्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समितीचा कारभार पाहत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा तसेच विद्यमान समिती सोयीसविधा देण्यात अकार्यक्षम असल्याचा आरोप मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केला आहे. गेली साच वर्षे झाले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला अध्यक्ष नाहीत. आधीचेच सदस्य मंदिर प्रशासनाचे काम पाहत आहेत. श्री विठ्ठलांचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयीसुविधा मिळत नाहीत. यामुळे नूतन मंदिर समितीची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी मराठा महासंघाच्यावतीने केली आहे.
हेही वाचा : प्रसूती दरम्यान मातेसह बाळाचा मृत्यू
मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्षांचा आरोप
श्री विठ्ठल मंदिर समितीच्या कामकाजावर मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष यांनी भाष्य केले आहे. विद्यमान समिती सोयीसुविधा देण्यात अकार्यक्षम असल्याचा ठपका मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी ठेवला आहे. तसेच विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करा असेही मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी म्हटले आहे.