बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात पाहायला मिळाले आहेत. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सगळ्यांनीच या प्रकरणावर चर्चा केली आहे. बीड प्रकरणात पोलिसांनी कामात कुचराई केल्याने त्यांची बदली करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अधिवेशनात सांगितले. याच पार्श्वभूमीवर बीडमध्ये नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
बीडमध्ये संतोष देशमुख हत्ये प्रकरणी कामात कुचराई केल्याने पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. अविनाश बारगळ असे पोलीस अधीक्षकांचे नाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात पोलिसांच्या बदलीची घोषणा केली. त्यानंतर तडकाफडकी अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली. बारगळ यांच्या बदलीनंतर नव्या पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. बीडमध्ये आता नवनीत कांवत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा : बीड प्रकरणात पोलिस अधिक्षकांची बदली होणार
कोण आहेत नवनीत कांवत?
नवनीत कांवत हे 2017 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरात उपायुक्त असलेले नवनीत कांवत हे बीडचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्विकारणार आहेत. बीडच्या पोलीस अधिक्षकपदी नवनीत कांवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनीत कांवत यांची धडाडीचे पोलिस अधिकारी म्हणून पोलीस दलात ख्याती आहे. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ते करणार आहेत.