भगवान शिवाच्या भक्तांना दरवर्षी महाशिवरात्रीची आतुरतेने प्रतीक्षा असते. दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सर्वत्र मंदिरे आणि शिवालयांमध्ये "बम बम भोले"च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झालेले असते. परंतु याच दिवशी म्हणजे महाशिवरात्री 2025 साठी बँक सुट्टी राहणार का असा प्रश्न सर्वानाच पडलाय. गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अनेक राज्यांमध्ये बँका महाशिवरात्रीनिमित्त बंद राहणार असल्याची माहिती समोर आलीय.
भारतातील बँका आरबीआय आणि राज्य प्राधिकरणांनी निर्धारित केलेल्या प्रादेशिक सुट्ट्यांच्या वेळापत्रकानुसार बंद राहणार आहे. ग्राहकांनी शाखांना भेट देण्यापूर्वी त्यांच्या प्रदेशातील बँक सुट्ट्यांची खात्री करावी. असे आवाहन देखील नागरिकांना करण्यात आलंय. बँकेच्या वेळापत्रकानुसार राष्ट्रीय आणि स्थानिक सुट्ट्यांमध्ये, तसेच प्रत्येक रविवारी आणि दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बंद राहतात. पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार कार्यरत राहतो, जोपर्यंत तो आरबीआयच्या दिनदर्शिकेत नमूद केलेल्या सुट्ट्यांमध्ये समाविष्ट नसतो.
हेही वाचा: Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला बनवा बटाट्यापासून चटपटीत पदार्थ
कुठे बँका बंद राहणार?
गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू-श्रीनगर, केरळ, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेश.
कुठे बँका उघड्या राहणार?
त्रिपुरा, तामिळनाडू, सिक्कीम, आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, नागालँड, बंगाल, नवी दिल्ली, गोवा, बिहार आणि मेघालय.