Thursday, September 04, 2025 06:01:55 AM

शिवनेरी गडावर मधमाशांचा हल्ला, वनविभागाची चौकशी सुरू

मधमाशांना डिवचणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.

शिवनेरी गडावर मधमाशांचा हल्ला वनविभागाची चौकशी सुरू

शिवनेरी गडावर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मधमाशांचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला सलग दुसऱ्या दिवशीही झाल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत गडावर जाणाऱ्या पर्यटकांसाठी तातडीने बंदी लागू केली आहे. शिवनेरी गडावर मधमाशा खवळल्याचे समजत असून कोणीतरी अज्ञात व्यक्ती मधमाशांना डिवचत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वनविभागाने स्पष्ट केले आहे की, या घटनेमुळे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते, त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत शिवनेरी गड शिवभक्तांसाठी बंद राहणार आहे. मधमाशांना डिवचणाऱ्या व्यक्तींची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे. स्थानिक प्रशासन आणि वनविभाग या संपूर्ण घटनेवर बारीक लक्ष ठेवून आहेत. गडावर पुन्हा अशा घटना होऊ नयेत यासाठी सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.

हेही वाचा: औरंगजेबाच्या कबरीवरून तणाव वाढला, खुलताबादमध्ये कडक पोलिस बंदोबस्त!


सम्बन्धित सामग्री