बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आवादा कंपनीच्या खंडणीप्रकरणावरून देशमुख यांची हत्या करण्यात आली. याचबाबतीत आता मोठी माहिती हाती लागली आहे. आवादा कंपनीबाहेर टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब समोर आला आहे.
आवादा कंपनीबाहेर एक चहाची चपरी आहे. तिथे चहा पिण्यासाठी आलेल्या प्रत्यक्षदर्शीने जबाब दिला आहे. 6 डिसेंबरला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी घुले साथीदारांसोबत कंपनीच्या गेटवर आला असे त्याने सांगितले आहे. त्यानंतर सुदर्शन घुलेनं साथीदारासोबत वॉचमनला शिवीगाळ केली. घुलेनं मारहाण करत कराडच्या नावानं 2 कोटींची खंडणी मागितल्याचा जबाब समोर आला आहे. मारहाणीदरम्यान सरपंच संतोष देशमुखा यांनी मध्यस्थी केली. "कंपनी बंद करू नका, गावातील लोकांना रोजगार मिळू द्या" अशी विनंती देशमुखांनी घुले आणि त्याच्या साथीदारांना दिली
प्रत्यक्षदर्शीने जबाबात नेमकं काय म्हटलं?
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आवादा एनर्जी कंपनीबाहेर चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा महत्त्वाचा जबाब समोर आला आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी दुपारी साडेबारा वाजता सुदर्शन घुले त्याच्या साथीदारासोबत आवादा एनर्जी कंपनीच्या गेटवर पोहोचला. या दरम्यान त्याने गेटवरील वॉचमनला शिवीगाळ केली. त्याचवेळी कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे तिथे दाखल झाले. त्यांना सुदर्शन घुलेने वाल्मीक कराडचा माणूस आहे. कंपनी सुरू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये खंडणी अण्णाला द्या अशी धमकी दिली. त्यावेळी सरपंच देशमुख घटनास्थळावर दाखल झाले आणि सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराला कंपनी बंद करू नका. गावातील लोकांना रोजगार मिळू द्या अशी विनंती करू लागले. मात्र सुदर्शन घुलेने सरपंच तुला बघून घेऊ. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. असा जबाब आवादा कंपनीबाहेर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिला आहे. या जबाबामुळे आरोपींचे पाय आणखी खोलात जात आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख फिर्यादी असलेल्या शिवराज देशमुख यांच्या जवाबातून धक्कादायक सत्यसमोर आले आहे. यातून पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. अपहरण झाल्यानंतर शिवराज देशमुख हे लगेच पोलीस स्टेशनला गेले होते. मात्र पोलिसांनी तीन ते साडेतीन तास दखल घेतली नाही. त्यावेळी पोलीस अधिकारी राजेश पाटील, प्रशांत महाजन महाजन आणि बनसोडे साहेब यांनी संपूर्ण हकीकतही पोलिसांना सांगितली. परंतु सदर पोलिसांनी मला तीन ते साडेतीन तास पोलीस स्टेशनला बसवले पोलीस कर्मचारी म्हणू लागले की फिर्याद दमानी (हळू) लिहावी लागते. तसेच कायदा बदललेला असल्यामुळे पुस्तक पाहून कलम लिहावे लागते असे म्हणत होते. त्यामुळे फिर्याद देण्याकरता बराच वेळ लागला.