पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्यावर सून वैष्णवी हगवणेचा बळी घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सासू, सासरे, नवरा, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस राजेंद्र हगवणे यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वैष्णवी हगवणेने मैत्रीणीसोबत केलेले संभाषण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या हाती लागले आहे.
वैष्णवी हगवणे हिने मैत्रीणीसोबत केलेल्या संभाषणाची ऑडीओ क्लिप पुढे आली आहे. लग्न करुन चूक केली अशी व्यथा वैष्णवी मैत्रिणीला सांगत होती. दोघींच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप 'जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी'च्या हाती लागली आहे. 'जय महाराष्ट्र' वाहिनी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करीत नाही.
हेही वाचा : राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणेंचा पोलिसांकडून शोध सुरु; हुंड्यासाठी सूनेचा बळी घेतल्याचा आरोप
वैष्णवी हगवणेने आधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वैष्णवीच्या वडिलांनी बावधन पोलिसात तक्रार दिली होती. फिर्यादीत 51 तोळे सोने, चांदी आणि एका आलिशान गाडीचा उल्लेख करण्यात असून आलिशान गाडी बावधन पोलिसांनी जप्त केली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वडील आनंद कस्पटे यांनी बावधन पोलिसांत फिर्याद दिली होती.
वैष्णवी हगवणे प्रकरण काय?
वैष्णवी हगवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणेंची सून आहे. 16 मे रोजी बेडरुममध्ये गळफास घेऊन तिने आत्महत्या केली असून मृत्यूपूर्वी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसून आल्या आहेत. हुंड्यासाठी वैष्णवीची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणात सासरा,सासू, नवरा, दीर आणि नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर अद्यापही फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे. 27 नोव्हेंबर 2023 मध्येही विष पिऊन वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. लग्नात वैष्णवीच्या घरच्यांकडून 51 तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी घेण्यात आली होती.