Wednesday, August 20, 2025 09:27:28 AM

नाशिकमध्ये कार आणि मोटारसायकलची भीषण धडक; 7 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी

हा अपघात दिंडोरी शहराजवळील वाणी-दिंडोरी रस्त्यावर एका नर्सरीजवळ घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11:57 वाजता त्यांना घटनेची माहिती मिळाली.

नाशिकमध्ये कार आणि मोटारसायकलची भीषण धडक 7 जणांचा मृत्यू 2 जण गंभीर जखमी
Nashik Accident प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

नाशिक: नाशिक जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात कार आणि मोटारसायकलची समोरासमोर टक्कर होऊन किमान 7 जणांचा मृत्यू झाला. तसेच या अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात दिंडोरी शहराजवळील वाणी-दिंडोरी रस्त्यावर एका नर्सरीजवळ घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11:57 वाजता त्यांना घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर दोन्ही वाहने रस्त्यालगतच्या लहान कालव्यात उलटलेली आढळली. 

7 जणांचा जागीच मृत्यू - 

अपघात इतका भीषण होता की, यात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर दोघे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी बचाव कार्य सुरू केले असून जखमींना बाहेर काढले. 

हेही वाचा - छांगूर बाबाच्या मुंबई, बलरामपूरसह 14 ठिकाणांवर ED चे छापे

टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला - 

दुसऱ्या एका घटनेत लडाखमधील कारगिल जिल्ह्यात एक दुर्दैवी अपघात घडला. बुधवारी गुमरीजवळ सकाळी 5:45 वाजता एक प्रवासी वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळले. या अपघातात 2 जणांचा मृत्यू, तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत.

हेही वाचा - नागपूर कारागृहात कैद्याची आत्महत्या; अंतर्वस्त्राच्या इलास्टिकने घेतला गळफास

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त वाहन द्रासहून श्रीनगरकडे निघाले होते. लष्कर, पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने संयुक्त बचाव मोहीम राबवली. घटनास्थळी दोन जण मृत अवस्थेत आढळले. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 


सम्बन्धित सामग्री