मुंबई: मुंबईतील कोस्टल रोड बोगद्यात पावसामुळे एक कार घसरली आणि ती उलटली. अशातच, कारमधील दोन्ही एअरबॅग्ज बंद पडले होते. मात्र, सीटबेल्ट लावलेल्या चालकाला किरकोळ दुखापत झाली. शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजता कार घसरली होती. या दुर्घटनेत कार चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही दुर्घटना घडल्यामुळे कोस्टल रोडवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
हेही वाचा: दादर येथे असलेल्या सावरकर सदनचे बांधकाम ‘जैसे थे’च
यादरम्यान, मुंबई सेंट्रल आरटीओ कार्यालयाचे टॅक्सी पथक संबंधित वाहनापासून काहीच अंतरावर होते. त्यांनी कोस्टल रोडवरील आपत्कालीन लँडलाइन फोनचा वापर करून नियंत्रण कक्षाला रुग्णवाहिका आणि टोइंग व्हॅन पाठविण्याची माहिती दिली. जेव्हा टोइंग व्हॅन घटनास्थळी दाखल झाली, तेव्हा कार उलटली होती. त्यांनी इतर चालकांची मदत घेऊन गाडी सरळ करण्यास मदत केली. सुदैवाने, यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.