Thursday, August 21, 2025 04:42:52 AM

शिवभोजन थाळीचे अनुदान थकल्याने विदर्भातील केंद्र चालकांनी दिला आंदोलनाचा इशारा

शिवभोजन थाळीचे अनुदान थकले आहे. त्यामुळे केंद्र चालकांना सहा महिन्यांपासून अनुदानच नाही. त्यामुळे विदर्भातील केंद्र चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिवभोजन थाळीचे अनुदान थकल्याने विदर्भातील केंद्र चालकांनी दिला आंदोलनाचा इशारा

नागपूर: शिवभोजन थाळीचे अनुदान थकले आहे. त्यामुळे केंद्र चालकांना सहा महिन्यांपासून अनुदानच नाही. त्यामुळे विदर्भातील केंद्र चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विदर्भातील शिवभोजन थाली केंद्रचालकांना सहा महिन्यांपासून अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे केंद्र चालक अडचणीत सापडले आहेत. वेळेवर अनुदान न मिळाल्यामुळे केंद्र चालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आर्थिक मदतीअभावी अनेक ठिकाणी शिवभोजन केंद्रे बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. या समस्येला वाचा फोडण्यासाठी विदर्भातील केंद्र चालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून वारकऱ्यांसाठी रेनकोट वाटप

आम्ही अन्न व नागरी पुरवठा मंत्री या नात्याने छगन भुजबळ यांना निवेदन दिले आहे. महाविकास आघाडीच्या काळात आलेल्या शिवभोजन थाळी योजनेची प्रलंबित बिल सरकारने लवकरात लवकर द्यावी अशी विनंती शिवभोजन केंद्र चालकांनी म्हटले आहे. शिवभोजन थाळी योजनेंतर्गत ग्रामीण भागात 10 रुपयांमध्ये आणि महानगरपालिका क्षेत्रात 40 रुपयांमध्ये जेवण दिले जाते. मात्र त्यामुळे आर्थिक गोष्टींचा देखील सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील हा दर वाढला पाहिजे. कारण ग्रामीण भागातील शिवभोजन केंद्र चालकांना त्याचा फटका बसत आहे असे केंद्र चालकांनी म्हटले आहे. तसेच लाडक्या भावाने या ही बहिणींकडे लक्ष दिले पाहिजे. आम्हाला सहा महिने झाले अनुदान नाही त्यामुळे आर्थिक गोष्टींचा सामना करत आहोत असे महिला केंद्र चालकांनी म्हटले. 

शिवभोजन थाळीचं अनुदान थकल्यानं वडेट्टीवारांची टीका
शिवभोजन थाळीचं अनुदान थकल्यानं माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन छेडले आहे. सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली. लाडकी बहीण योजना आणल्यानंतर इतर योजनांना कात्री लावल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे. शिवभोजन योजना एक चांगली योजना असून गरीब आणि मजूर कामगारांना फक्त दहा रुपयात जेवण मिळत आहे. अगोदर ते पाच रुपयात मिळत होतं. आता दहा रुपयात मिळतं. एवढेसे पैसे या सरकारला देन होत नाही आणि सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली आहे असं म्हणावे लागेल असे वडेट्टवार यांनी म्हटले आहे.  


सम्बन्धित सामग्री