केंद्र सरकारने त्रिभाषा सूत्रावर स्पष्टीकरण दिलं आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत तीन भाषा शिकवण्याचं लक्ष आहे. विद्यार्थ्यांना 14 व्या वर्षापर्यंत हिंदी भाषा शिकवू शकता. पहिली ते पाचवीपर्यंत तीन भाषा शिकवणे गरजेचे नाही असे केंद्र रकारने राज्य सरकारला सांगितले आहे. केंद्र सरकारच्या नियमानुसार पहिली ते पाचवी त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यात येत आहे असे राज्य सरकारचे म्हणणे होते. मात्र पहिली ते पाचवीपर्यंत तीन भाषा शिकवणं गरजेचं नाही असे म्हणत केंद्राने राज्य सरकारला चपराक दिली आहे.