Thursday, August 21, 2025 03:39:01 AM

सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक; नाशिक पोलिसांकडून एकाला अटक

नाशिकमध्ये सरकारी नोकरीचं आमिष दाखवून एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक नाशिक पोलिसांकडून एकाला अटक

नाशिक : नाशिकमध्ये सरकारी नोकरीचं आमिष दाखवून एका व्यक्तीची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मंत्रालयातील सचिवांचा पीए असल्याची बतावणी करत ही फसवणूक करण्यात आली आहे. या घटनेमध्ये नाशिक पोलिसांकडून एकाला अटक करण्यात आली आहे. 

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत आणि आता नाशिकमधून अशी घटना समोर आली आहे. नोकरीचे आमिष दाखवत एकाला तब्बल 71 लाख 50 हजाराचा गंडा घालण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीने मंत्रालयात सचिवांचा पीए असल्याचे सांगून असे कृत्य केले आहे. नाशिकमधील व्यक्तीने फसवणुक झाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली.  महिनाभरापासून पोलिसांना आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर आरोपीला पोलिसांनी अटक केली.  

हेही वाचा : उल्हासनगर हादरलं! 7 महिन्याचा गर्भ पुरला जमिनीत

मंत्रालयातील सचिवांचा पीए असल्याची बतावणी करत लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्याला नाशिक पोलिसांनी अटक केली. पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने फसवणूक करणारा प्रकाश कदम याला नाशिकच्या लासलगाव येथून ताब्यात घेतले. मंत्रालयातील मुख्य सचिवांचा पीए असल्याचे सांगून त्याने तब्बल 71 लाख 50 हजाराची फसवणूक केली. संजय कोटकर नावाच्या व्यक्तीने या प्रकरणाची तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. संशयित आरोपी प्रकाश कदम हा एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी सापळा रचून लासलगाव येथून त्याला अटक केली. संशयित बदलापूर ठाणे येथील राहणारा असल्याची माहिती आहे. 


सम्बन्धित सामग्री