Wednesday, August 20, 2025 09:19:24 AM

मुख्यमंत्री फडणवीसांकडून गणबोटे कुटुंबाचं सांत्वन

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरान खोऱ्यात मंगळवारी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला.

मुख्यमंत्री फडणवीसांकडून गणबोटे कुटुंबाचं सांत्वन

पुणे: काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरान खोऱ्यात मंगळवारी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांत्वनासाठी दाखल झाले असून त्यांच्यासोबत राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार हर्षवर्धन पाटील देखील हजर आहेत.

नेमकं काय घडलं? 
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरान खोऱ्यात मंगळवारी पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात पुण्यातील कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला. त्यांना गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास विमानाने पुण्यात आणण्यात आले. सकाळी त्यांचे पार्थिव अप्पर इंदिरानगर येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी अनेक नेते अंत्यदर्शनला उपस्थित होते. 

यावेळी कौस्तुभ यांच्या पत्नी संगीता यांनी नेमकं काय झालं त्यांनी स्वतःच्या बचावासाठी काय केलं  याबद्दल माहिती दिली.  त्या म्हणाल्या, अतिरेक्यांनी आम्हाला मारू नये म्हणून आम्ही लगेच कपाळाच्या टिकल्या काढून फेकल्या. आणि मग काय म्हणावं कळत नव्हतं तरी आम्ही सगळे अल्ला हु अकबर.. अल्ला हु अकबर म्हणायला लागलो. मात्र, तरीही त्यांनी पुरुषांना मारले. आणि हा प्रसंग आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघत असल्यामुळे आणखी भीती वाटू लागली.' असं संगीत यांनी सांगितलं. 
 


सम्बन्धित सामग्री