मालेगाव येथील कळवणच्या अभोणा पोलीस ठाण्यात मागील भांडणाच्या कुरापतीवरून दोन गटात झालेल्या मारहाण व वाहनाच्या काचा फोडल्याच्या घटनेनंतर तक्रार देण्यासाठी पोलीस स्थानकात आलेले दोन्ही गट पुन्हा एकामेकाला भिडले. चक्क पोलीस स्थानकात तुंबळ हाणामारी सुरू झाली. हाणामारीचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.पोलिसांनी दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे.