Wednesday, August 20, 2025 11:30:02 AM

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर! एका दिवसात 45 नवीन रुग्ण

एका दिवसात राज्यात 45 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या संपूर्ण राज्यात 210 सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे.

महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा कहर एका दिवसात 45 नवीन रुग्ण
Corona Virus
Edited Image

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना विषाणूने डोके वर काढले आहे. एका दिवसात कोविड रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहेत. एका दिवसात राज्यात 45 नवीन रुग्ण आढळले आहेत. सध्या संपूर्ण राज्यात 210 सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. आरोग्य विभागाकडून रुग्णांची तपासणी केली जात आहे. महाराष्ट्रात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. 

जानेवारीपासून आतापर्यंत 6819 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. 210 पैकी 183 कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत सक्रिय आहेत. एका दिवसात नोंदवलेल्या 45 प्रकरणांपैकी 35 प्रकरणे मुंबईत नोंदवली गेली. आतापर्यंत 81 लोक कोविडमधून बरे झाले आहेत आणि 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - लातुर महापालिकेचा दवाखाना चक्क ग्रामपंचायत हद्दीत; स्वराज्य पक्षाकडून कारवाईची मागणी

महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिले अपडेट - 

कोविडबाबत अपडेट देताना, महाराष्ट्र आरोग्य विभागाने सांगितले की, सध्या राज्यात कोविडसाठी ILI (इन्फ्लूएंझा सारखी आजार) आणि SARI (गंभीर तीव्र श्वसन संसर्ग) सर्वेक्षण सुरू आहेत. या सर्वेक्षणात अशा रुग्णांची कोविड चाचणी केली जाईल. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना नियमित उपचार दिले जातात. राज्यात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत आहेत. लोकांमध्ये कोविडची सौम्य लक्षणे आढळत आहेत.

हेही वाचा - 'विवाहितेला विष पाजून...'; सोलापुरात विवाहितेला काठी आणि रॉडने मारहाण

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड चाचणी आणि उपचार उपलब्ध आहेत. आरोग्य विभागाने लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 35, रायगडमध्ये 2, पुण्यात 4, कोल्हापूरमध्ये 2, ठाण्यात 1 आणि लातूरमध्ये 1 कोरोनाचे रुग्ण आढळला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री