मुंबई : बीडमधील खेड तालुक्यातील पाईट गावात धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे राजेंद्र घनवट आणि त्यांचे वडील पोपटलाल घनवट यांनी शेतकऱ्यांची लूट केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यानंतर या जमिनीसंदर्भात त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. एसआयटी स्थापन करून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी यावेळी दमानिया यांनी केली.
सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी घनवट कुटुंबाची असलेल्या जमिनीची माहिती दिली. घनवट कुटुंबाकडे पाईट गावात व इतर ठिकाणी असलेल्या जमिनीची माहिती दिली. एसआयटी स्थापन करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आहेत असे दमानिया यांनी सांगितले आहे. लवकरच घोषणा होईल. स्टॅम्प ड्युटीसाठीही पैसे भरावे लागतात. त्याबाबत मार्गदर्शक सूचना देतील.पाईट गावात पोपट घनवट यांच्या नावावर 56 हेक्टर व इतर कुटुंबाच्या नावावर 300 एकर जमीन आहे. फेरफार आढळत नाही. पैसा कुणी भरले, कर भरला होता का? गुन्हे कुणी दाखल करायला लावले ? याची माहिती समोर येईल असेही दमानिया यांनी म्हटले आहे. मराठवाड्यात एक टोळी मुलींची फसवणूक करणारी टोळी आहे. मराठवाड्यात काही आत्महत्या झाल्या आहेत. याची सखोल चौकशी करण्याची मागणी गृह राज्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे देखील दमानिया यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : सैफ अली खान मारहाण प्रकरणात मलायका अरोरा विरोधात वॉरंट
नेमकं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाईट गावात धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे राजेंद्र घनवट आणि त्यांचे वडील पोपटलाल घनवट यांनी शेतकऱ्यांची लूट केली अशी माहिती दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत दिली होती. यानंतर महसूल मंत्र्यांनी सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक बोलवली आणि ती मंत्रालयात पार पडली. सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले आणि पुन्हा 8 तारखेला दुपारी तीन वाजता या सगळ्या चौकशीची माहिती त्यांच्याकडून मागवण्यात आली होती. राजेंद्र घनवट आणि पोपटलाल घनवट यांच्या पाईट गावात असलेल्या घराची व जमिनींची पूर्ण माहिती मागवण्यात आली.