Wednesday, August 20, 2025 09:16:35 AM

उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर, शिंदेंनी घेतली शहा-मोदींची भेट, भेटीमागील कारण काय?

एकीकडे, एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देणार आहेत आणि दुसरीकडे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर शिंदेंनी घेतली शहा-मोदींची भेट भेटीमागील कारण काय

दिल्ली: राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे आणि भेटीगाठी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे, एससीओच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनला भेट देणार आहेत आणि दुसरीकडे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, उपमुख्यमंत्री शिंदेंनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आहे. 

बुधवारी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या दरम्यान, शिवसेनेचे सर्व खासदार उपस्थित होते. अशातच, उपमुख्यमंत्री शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीमागील कारण काय? तसेच, उपमुख्यमंत्री शिंदेंनी अचानक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदींची भेट का घेतली? अशा अनेक प्रकारच्या उलटसुलट चर्चा होऊ लागल्या. यावर, उपमुख्यमंत्री शिंदेंनी या भेटीमागील कारण सांगितले. 

jai maharashtra news

'काही खासदारांचे...' - उपमुख्यमंत्री शिंदे

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे, मी पक्षाच्या सर्व खासदारांसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट होती. यात काही खासदारांचेही विषय होते. ते विषय मी त्यांच्याकडे मांडले आहेत. मागील आठवड्यात मी दिल्लीत आलो होतो. मात्र, तेव्हा मी गृहमंत्री अमित शाह यांना नाही भेटू शकलो. त्यामुळे, आज गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर सदिच्छा भेट झाली आणि काही खासदारांचे विषय होते, त्यावर चर्चा झाली. यासह, आज सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेटही घेतली'. 

पुढे, उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'तसेच, अमित शाह यांना सर्वाधिक काळ गृहमंत्रिपद भुषवण्याचा मान मिळाला. त्याबाबत, मी अमित शाहांचे अभिनंदन केले. यासह, काल झालेल्या एनडीएच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाहांचे अभिनंदन केले. अमित शाहांनी अतिशय चांगले काम केले असून आणखी खूप चांगलं काम करायचं आहे, असं पंतप्रधान मोदी देखील म्हणाले. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे'. 


सम्बन्धित सामग्री