मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेबरोबरच राज्यातील आठ महानगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंदी घातली आली. या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलं. यामुळे इम्तियाज जलील यांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन-मटण पार्टी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान जलील यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांसह बऱ्याच जणांना पार्टीचं आमंत्रण देण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने 15 ऑगस्ट मांसविक्रीवर बंदी घातल्याने महापालिकेच्या निर्णयाला जलील यांनी विरोध दर्शवला.
दरम्यान आज सगळ्यांनी मांसविक्री बंदीच्या निर्णयाला विरोध केला पाहिजे. आयुक्त कोण मला काय खायचं, हे सांगणारा? असा सवाल यावेळी जलील यांनी केला. मी स्वत: चिकन बिर्याणी बनवत आहे. त्याचबरोबर मी एक शाकाहारी पदार्थही तयार केलेली आहे. समजा आयुक्त आले आणि मला शाकाहारी खायची आहे असे बोलले तर म्हणून मी शाकाहारी डिश तयार ठेवली आहे असा मिश्किल टोला त्यांनी आयुक्तांना लगावला आहे.
हेही वाचा: Manoj Jarange: तुकडे मोडून भुकायचं काम करू नको, तुझ्यामुळे फडणवीस पुन्हा अडचणीत येईल; जरांगेंची भुजबळांवर जहरी टीका
पुढे बोलताना आयुक्तांना मी हे सांगणार आहे की मी काय खायचं आणि काय नाही, तुम्ही मला सांगू नका, हे सरकारने कुठेतरी थांबवायला पाहिजे. दुर्देवाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारचे निर्णय घेणार असाल तर स्वातंत्र्य दिनाला काय अर्थ उरणार आहे असे जलील यांनी म्हटले आहे.