राज्य शासनाने येत्या गोपाळकाला (दहिहंडी) आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी देण्यात येणाऱ्या सार्वजनिक सुट्टीऐवजी यंदा नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जनादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या सामान्य शासन विभागानं जारी केले आहे. त्यामुळे यंदा नागरिकांना दहिहंडी, अनंत चतुर्दशीला सुट्टी न देता ती नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठगौरी विसर्जनाला मिळाली आहे. शासन परिपत्रकानुसार हा निर्णय केवळ मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय तसेच निमशासकीय कार्यलयांनाच लागू होणार आहे.
हेही वाचा : बहिणींसाठी खास गिफ्ट! रक्षाबंधनाच्या दिवशी 'या' राज्यात महिलांसाठी मोफत बस सेवा
यंदा शनिवार, 16 ऑगस्ट 2025 रोजी गोपाळकाला (दहिहंडी) तर शनिवार, 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी येत आहे. बऱ्याच सरकारी कार्यालयांना शनिवारी सुट्टी किंवा अर्धा दिवस काम असते. त्यामुळे या दोन सणांना यंदा सुट्टी दिली नसल्याचे समजते. तसेच त्याऐवजी शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी येणाऱ्या नारळी पौर्णिमा आणि मंगळवार, 2 सप्टेंबर 2025 रोजी येणाऱ्या ज्येष्ठगौरी विसर्जनाला ही शासकीय सुट्टी देण्यात आली आहे.