मुंबई: नुकताच, शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले. 'विरोधी पक्षाला माजी कॉपी करणे जमणार नाही. मी ओरिजनल आहे. इतकच नाही, तर उद्धव ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही', असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. नुकताच, संजय गायकवाड यांनी त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे.
हेही वाचा: बच्चू कडू यांना 3 महिन्यांची शिक्षा अन् लगेच जामीन मंजूर; नेमकं प्रकरण काय?
संजय गायकवाडांचा 'यू-टर्न'
'मंगळवारी, महाराष्ट्रासह देशभरातील महाविकास आघाडीच्या लोकांनी महाराष्ट्र आणि देशभरातील भारतीय जनता पक्ष तसेच, महायुतीच्या आमदारांविरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले होते. अशातच, माझ्या मतदारसंघातही प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. याबाबत, जेव्हा मला प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मी उत्तर दिले की, 'माझे प्रतिकात्मक आंदोलन करण्याची उभाठाच्या कार्यकर्त्याच्या बापाची अवकात नाही. तुम्ही डायरेक्ट बाळासाहेबांचे नाव केले. माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. बाळासाहेब ठाकरे हे रक्ताने उद्धव साहेबांचे वडील आहेत. तसेच, बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे दैवत आहे आणि ते सर्वांचे बाप आहेत. आपल्याकडे बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आहे. मी उभाठाच्या कार्यकर्त्यांबाबत बोललो होतो', अशी प्रतिक्रिया संजय गायकवाडांनी दिली.
हेही वाचा: Today's Horoscope: 13 ऑगस्टला कोणत्या राशींना अडचणींचा सामना करावा लागेल? जाणून घ्या
सुषमा अंधारे म्हणाल्या
'संजय गायकवाड यांची काम करण्याची पद्धत छपरी आणि टुकार आहे. तसेच, संजय गायकवाड बरोबर म्हणाले की, छपरी चाळे, टुकारगिरी करणाऱ्यांची कॉपी कोणी करू शकणार नाही आणि त्यांची शाखा कुठेही नाही', असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
नेमकं प्रकरण काय?
'ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यांना काही काम राहिलेलं नाही. तसंही, ते माझी कॉपी करू शकत नाही. कारण, मी ओरिजनल आहे.इतकंच काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बापालाही माझी कॉपी करणं जमणार नाही. विरोधी पक्षाने लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवायला हवा. पण ते नको त्या गोष्टीवर आंदोलन करतात. राज्यात फक्त 20 जागा देऊन जनेतेने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे. जे कधी मातोश्रीमधून बाहेर पडत नव्हते, आता ते स्वत: बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता तरी त्यांनी सुधारावं. कारण आम्ही आता महायुतीमध्ये आहोत. भाजपाला त्यांचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे आणि मी माझ्या पक्षाचं काम करतोय. सर्व पक्षांना आपापलं काम करण्याचा अधिकार आहे', असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले होते.