Sunday, August 31, 2025 09:22:20 AM

Imtiyaz Jaleel: इम्तियाज जलील यांच्याकडून मांसविक्री बंदीचा विरोध, 15 ऑगस्टला करणार चिकन-मटण पार्टी

15 ऑगस्टला इम्तियाज जलील चिकन-मटण पार्टी करणार आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्याकडून मांसविक्री बंदीचा विरोध करण्यात येत असल्याचे दिसत आहे.

imtiyaz jaleel इम्तियाज जलील यांच्याकडून मांसविक्री बंदीचा विरोध 15 ऑगस्टला करणार चिकन-मटण पार्टी

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेबरोबरच राज्यातील आठ महानगरपालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी मांसविक्रीवर बंदी घातली आहे. या मुद्द्यावरुन वादाला तोंड फुटलेलं असतानाच इम्तियाज जलील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 15 ऑगस्टला इम्तियाज जलील चिकन-मटण पार्टी करणार आहेत. त्यामुळे इम्तियाज जलील यांच्याकडून मांसविक्री बंदीचा विरोध करण्यात येत असल्याचे दिसत आहे. जलील यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांनाही पार्टीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. 

हेही वाचा: Narayan Rane: मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरेनं संपवलं; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

चिकन-मटण पार्टीसंबंधी जलील यांनी एक एक्स पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी "15 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता माझ्या निवासस्थानी आयोजित चिकन बिर्याणी आणि मटण कोरमा पार्टीमध्ये सामील व्हा. मांसविक्री बंदीचं तुघलकी फर्मान जारी करणाऱ्या सर्व महानगरपालिका आयुक्तांना पार्टीचं आमंत्रण. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही चिकन-मटण पार्टी खास आमंत्रण. भारत हा एक स्वतंत्र आणि लोकशाही देश आहे आणि महाराष्ट्र हा हुकूमशहा शासित राज्य नाही. ज्यांना अद्याप स्वातंत्र्याचा अर्थ समजलेला नाही, त्यांना आठवण करून देण्यासाठी ही पार्टी आयोजित केली आहे", असे म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री