मुंबई: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. शनिवारी या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजता त्यांच्या आंदोलनासाठी दिलेली मुदत संपली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एका दिवसाची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आजही मुंबईत जरांगेंचे उपोषणा सुरु राहणार आहे. सरकारचे काही प्रतिनिधी जरांगेंना भेटणार असल्याची माहिती समोर येत आहे.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली. निवृत्त न्यायमूर्ती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. दरम्यान शिंदे समितीने मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र जरांगे पाटील यांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नसल्याचे वक्तव्य जरांगेंनी केलं.
हेही वाचा: Manoj Jarange New Update: मनोज जरांगेंच्या उपोषणाला मुदतवाढ, पोलिसांकडून...
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दिसरा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा दिसरा दिवस आहे. राज्यातून जरांगे पाटील यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. शनिवारी मराठा उपसमितीचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले होते. आज सरकारचं शिष्टमंडळ येणारं का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.