मुंबई: 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रापासून ते देश विदेशात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की बाप्पाला मोदक आवडतात. यामुळे बाप्पाला मोदक अर्पण केले जातात.
बरेच जण बाप्पासाठी घरीच मोदक बनवतात. तर काही जण आपल्या बाप्पाला मोदक अर्पण करण्यासाठी मोदकांमध्ये व्हरायटी शोधत असतो. या काळात सर्वात जास्त मोदकांची खरेदी केली जाते.
हेही वाचा: Mumbai Megablock: गणराया पावला, लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खास गिफ्ट
गणेशोत्सवाच्या काळात मोदकांच्या खरेदीला प्राधान्य दिले जाते. बाप्पाला मोदक आवडतात. त्यामुळे बाप्पासाठी मोदकांची खरेदी केली जाते. तसेच गणेशोत्सवाच्या काळात लाडक्या बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दिला जातो.
गणेशोत्सव काळात बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांची सर्वाधिक खरेदी होते. यानिमित्त बाजारात आता पारंपारिक उकडीच्या मोदकांसह विविध प्रकारचे मोदक दाखल झाले आहेत. परंतु, नाशिकमधील एका मिठाईच्या दुकानातील मोदक भाव जास्त महाग असल्याचे दिसत आहे. या दुकानातील मोदकाचे दर चक्क 20 हजार रुपये किलो आहेत. या मोदकामध्ये सोने आणि चांदीचे वर्ख असल्यामुळे हे मोदक इतके महागडे असल्याचे दुकानदाराने सांगितले.