मुंबई : मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज, शनिवारी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. गणेशोत्सव काळातील शाळा-कॉलेजच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, ही मागणी अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांच्याकडे केली. तसेच निवेदन त्यांनी शेलार यांच्या दिले. या भेटीनंतर स्वतः अमित ठाकरेंनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच आशिष शेलार यांनीही माध्यमांसमोर या मागणीला दुजोरा देत त्यांच्या निवेदनावर विचार केला जाईल, असे म्हटले आहे.