Sunday, August 31, 2025 04:41:00 AM

Ganeshotsav 2025: गणेशमंडळांसाठी महत्त्वाची बातमी; गणेशोत्सवात डीजेच्या वापरावर बंदी, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

गणेशोत्सवादरम्यान तुमच्याकडून एक चूक होऊ देऊ नका, अन्यथा पोलीस तुमच्यावर कारवाई करतील. हा नियम म्हणजे गणेशोत्सव काळात चुकूनही डीजे वाजवू नका, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल.

ganeshotsav 2025 गणेशमंडळांसाठी महत्त्वाची बातमी गणेशोत्सवात डीजेच्या वापरावर बंदी मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. 10 ऑगस्टला रविवारी अनेक मोठ्या मंडळाच्या गणपतींचे आगमन झाले आहे. यादरम्यान मुंबई पोलिसांनी एका नियमाची आठवण करुन दिली आहे. रविवारी लालबाग, परळ, दादरसह अनेक मोठ्या मंडळाच्या गणपतींचे आगमन झाले. यामुळे या परिसरात रविवारी नागरिकांची तुफान गर्दी होती. ढोल ताशाच्या गजरात मंडळांनी आपल्या गणरायाचं स्वागत केलं. दरम्यान या उत्साहात तुमच्याकडून एक चूक होऊ देऊ नका, अन्यथा पोलीस तुमच्यावर कारवाई करतील. हा नियम म्हणजे गणेशोत्सव काळात चुकूनही डीजे वाजवू नका, अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल. मराठी सण किंवा हिंदू धर्मातील सणांचा का डीजेला बंदी असते?, इतर वेळी का बंदी आणली जात नाही?, असे बऱ्याच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.याचे तथ्य जाणून घेण्यासाठी चिंचपोकळी चिंतामणी सार्वजनिक मंडळाचे सचिव गजेंद्र बने यांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बातचित केली. यावेळी बऱ्याच ठिकाणी डीजे लावले जातात. मात्र गणेशोत्सव आल्यावरच का निर्बंध लावले जातात असा सवाल बने यांनी केला आहे. 

न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईत डीजे बंदी आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात डीजे वाजल्यास मुंबई पोलीस कारवाई करणार आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करतील. ज्या मंडळाकडून या आदेशांचे उल्लंघन होईल त्यावर होणार कडक कारवाई केली जाईल. यामुळे पोलिसांचं अशा मंडळांवर बारीक लक्ष असेल. 


महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असणारा, सामाजिक जीवनात अत्यंत महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजे गणेशोत्सव. पण गेल्या काही वर्षात डीजेच्या दणदणाटामुळे या उत्सवाच्या उत्साहाला गालबोट लागलंय. कारण गणेशोत्सव आणि डीजे हे सध्या समीकरण बनलंय. डीजेच्या अतीप्रचंड आवाजात काढल्या जाणाऱ्या मिरवणुकांमुळे आता त्यावर कायद्याने कारवाई करण्याची वेळ आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मुंबईत डीजे बंदी लागू केली आहे. 

हेही वाचा: Viral Video : मुलाकडून जन्मदात्याला मारहाण, आई मात्र बघत बसली, नागपूरच्या व्हायरल व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ

न्यायालयाने काय निर्देश दिले? 

ध्वनी प्रदुषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश दिले आहेत. गणेशोत्सवात मुंबईत डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान डीजेवर बंदी घातली आहे. रात्री 10 नंतर आवाजाची पातळी 50 डेसिबलच्या आत असावी. आवाज मर्यादेचे उल्लंघन झालं तर पोलीस कारवाई होणार आहे. ध्वनी मर्यादेचं उल्लंघन करणारं साहित्य जप्त करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन केल्यास डीजे साउंड सिस्टम, मिक्सर, लाऊडस्पीकर जप्त करण्यात येतील. डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य वापरण्याचे आवाहन न्यायालयाकडून करण्यात आले आहे. डीजे बंदीचे उल्लंघन,पदाधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. बंदीचे उल्लंघन केल्यास मंडळाचा परवाना रद्द होऊ शकतो. मंडळाच्या मंडपावर इतर निर्बंध घातले जाऊ शकतात. 

डीजेमुळे एकतर ध्वनीप्रदुषण होतंच होतं. पण या आवाजामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात. गेल्या काही वर्षांत डीजेच्या या दणदणाटामुळे काहीजणांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. पण तरीही डीजेचा आवाज कमी होण्याची चिन्ह नाहीत. डीजे, लेझर लाईट किंवा इतरांना त्रास होईल अशा कोणत्याही गोष्टी गणेशोत्सवात कधीच नव्हत्या. थोरामोठ्यांनी सांगूनही गणेश मंडळाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी डीजेचा दणदणाट कमी केला नाही. मिरवणुकीत काहींचे जीव गेले तरी पर्वा नाही इतकी डीजेची झिंग चढली आहे. ही झिंग इतकी आहे की दोन चार हजारांच्या दंडाने किंवा डीजे जप्तीने ती उतरेल असं दिसत नाही. त्यामुळे या डीजेच्या उन्मादाला आवर घालण्यासाठी आता सणसणीत उपायांचीच गरज आहे. 


 


सम्बन्धित सामग्री