Sunday, August 31, 2025 06:10:36 AM

Richest Ganesh Idol GSB Ganpati : नवसाला पावणारा सर्वात श्रीमंत गणराय; 69 किलो सोनं, तर 336 किलो चांदीनं नटलेला जीएसबीचा बाप्पा

मुंबईत असाच एक प्रसिद्ध गणपती आहे, जो सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवलेला आहे. या गणेश मंडळाचे नाव आहे जीएसबी सेवा मंडळ.

richest ganesh idol gsb ganpati  नवसाला पावणारा सर्वात श्रीमंत गणराय 69 किलो सोनं तर 336 किलो चांदीनं नटलेला जीएसबीचा बाप्पा

मुंबई: गणपती बाप्पा मोरया! गणेशोत्सव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं आनंदाचा उत्सव, सजावट, आरती, भजन, नैवेद्य, आदी. मुंबईत अनेक गणपती आहेत, जे त्यांच्या मनमोहक आणि निरागसणामुळे तसेच उत्कृष्ट सजावटीमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. तुम्हाला माहित आहे का? मुंबईत असाच एक प्रसिद्ध गणपती आहे, जो सोन्या-चांदीच्या दागिन्यांनी सजवलेला आहे. या गणेश मंडळाचे नाव आहे जीएसबी सेवा मंडळ. 

यंदा, जीएसबी सेवा मंडळ सायन येथील किंग्ज सर्कल येथे सुरू होईल आणि पाच दिवस चालेल. यासह, जीएसबी सेवा मंडळ सर्वात श्रीमंत मंडळांपैकी एक मानले जाते. यावर्षी, जीएसबीच्या गणपती बाप्पाला 69 किलो सोने आणि 336 किलो चांदीच्या दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. तसेच, यावर्षी जीएसबी सेवा मंडळाने 2025 च्या गणेशोत्सवासाठी 474.46 कोटी रुपयांचा विमा उतरवला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत भारतातील कोणत्याही गणेष मंडळाने इतका मोठा विमा उतरवला नव्हता. त्यामुळे, यंदा हा विक्रम जीएसबी सेवा मंडळाच्या नावावर जमा झाला आहे. 2023 मध्ये जीएसबी सेवा मंडळाने 360.40 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. त्यानंतर, 2024 मध्ये जीएसबी सेवा मंडळाने 400 कोटी रुपयांचा विमा उतरवला होता. 

474 कोटींच्या विम्यामध्ये 'या' गोष्टींचा समावेश आहे

375 कोटी रुपये: स्वयंसेवक, पुजारी, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक आदींसाठी अपघात विमा काढण्यात आला आहे. 

67 कोटी रुपये: सोने आणि चांदीच्या दागिन्यांसाठी विमा काढण्यात आला आहे. 

30 कोटी रुपये: गर्दीमुळे होणाऱ्या अपघातांसाठी विमा काढण्यात आला आहे. 

2 कोटी रुपये: आग किंवा भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीसाठी विमा काढण्यात आला आहे. 

43 लाख रुपये: मंडप परिसरासाठी विशेष विमा काढण्यात आला आहे. 


सम्बन्धित सामग्री