Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सवानंतर कोकणातून मुंबईकडे परतीचा प्रवास सुरू होणार आहे. या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने विशेष व्यवस्था केली आहे. गणेश विसर्जनानंतर प्रवाशांना सुलभता मिळावी म्हणून कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेगाड्या चालवल्या जात आहेत. यात मुख्य म्हणजे चिपळूण पनवेल मेमू अनारक्षित विशेष रेल्वेगाडी, जी प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरेल.
भारतीय रेल्वे गणेशोत्सवानिमित्त एकूण 380 विशेष रेल्वेगाड्या चालवत आहे. कोकण विभाग आणि महाराष्ट्रातील इतर भागांतून मध्य रेल्वेने 310 गणपती विशेष रेल्वेगाड्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. गणेशोत्सव साजरा करताना लोक मोठ्या संख्येने कोकणातून मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त सुविधा देणे आवश्यक ठरले.
हेही वाचा: Gauri Avahana 2025: गौरी आवाहन कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पारंपरिक पूजा विधी, फराळ आणि विसर्जनाचं संपूर्ण मार्गदर्शन
चिपळूण- पनवेल मेमू अनारक्षित विशेष रेल्वेगाडी
-
गाडी क्रमांक 01160
-
चिपळूण येथून ३ व ४ सप्टेंबर रोजी सकाळी 11.05 वाजता सुटेल
-
पनवेल येथे दुपारी 4.10 वाजता पोहचेल
-
मार्गावर अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे या स्थानकांवर थांबे आहेत
-
रेल्वेगाडीमध्ये 8 मेमू डबे आहेत
पनवेल- चिपळूण मेमू अनारक्षित विशेष रेल्वेगाडी
लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड द्वैसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडी
या रेल्वेगाड्या ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप येथे थांबे देतील.
रेल्वेगाड्यांमध्ये 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे, 12 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी डबे आणि 2 द्वितीय आसन व्यवस्था असलेले गार्ड ब्रेक व्हॅन असेल.
गणेशोत्सवानंतर कोकणातून प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरळीत होण्यासाठी ही व्यवस्था अत्यंत सोयीची ठरेल. प्रवाशांना गर्दी टाळता येईल आणि सुरक्षित प्रवासाची हमी मिळेल.