Sunday, August 31, 2025 01:01:46 PM

Mumbai Megablock: गणराया पावला, लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खास गिफ्ट

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणपती पावला आहे.

mumbai megablock गणराया पावला लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खास गिफ्ट

 

मुंबई: रविवार म्हटंल की मेगाब्लॉक ठरलेला असतो. परंतु मुंबईकरांना आज दिलासा मिळाली आहे. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. गणेश उत्सव आणि मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा समाजाच्या आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मेगाब्लॉक रद्द करण्यात आलेला आहे. 

27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून लाडक्या बाप्पाला भेटण्यासाठी भाविक आतुरतेने रविवारची वाट बघत होते. पण त्यांना मेगाब्लॉकचं टेन्शन होतं. आता गणेशभक्तांना रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गणेशभक्तांना गणराया पावला आहे. 

हेही वाचा: Manoj Jarange Patil: रविवारीही मनोज जरांगे उपोषण करणार, पोलिसांकडून एका दिवसाची परवानगी

मराठा समाजाच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे लाखो मराठ्यांची फौजफाटा मुंबईत पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुंबईत लोकांची गर्दी दिसत आहे. तसेच गणेशोत्सव सुरु असल्याने मुंबईमध्ये गणपती बघण्यासाठी भाविकांची गर्दी आहे. या दोन गोष्टींमुळे रेल्वे प्रशासनाने आज मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे लोकांचा प्रवास सुखकर होणार आहे. मुंबईत वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. 


सम्बन्धित सामग्री