मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांसह हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. 27 ऑगस्टपासून त्यांनी घर सोडलं आहे आणि 29 ऑगस्टला ते मुंबईत आले. यानंतर मुंंबईतील आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगेंनी गेल्या दोन दिवसांपासून उपोषण केलं आहे. तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने मराठा एकवटला आहे. दक्षिण मुंबईतील वातावरण भगवे झाले आहे. त्यातच आता एका मराठा आंदोलकाच्या मृत्यूची दुर्देवी घटना समोर आली आहे.
मुंबईत एका मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विजय घोगरे असं या आंदोलकाचे नाव होते. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील हा तरुण असल्याची माहिती आहे. 29 ऑगस्टपासून मराठा आंदोलक मुंबईत आले आहेत. यावेळी त्यांचे प्रचंड हाल झाल्याचे समोर आले. याच आंदोलनादरम्यान आणखी एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर शनिवारी विजय घोगरेचा देखील मृत्यू झाला.
हेही वाचा: Manoj Jarange Patil: रविवारीही मनोज जरांगे उपोषण करणार, पोलिसांकडून एका दिवसाची परवानगी
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील तरुणाचा मुंबई येथे मराठा आंदोलनावेळी हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहेत. मागच्या दोन दिवसांपूर्वीच, मुंबईकडे कूच करताना जुन्नर येथे एका मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. दरम्यान पुन्हा मुंबई येथे आंदोलनात सहभागी असलेल्या विजय घोगरे या मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. तो तरुण लातूरमधील असल्याची माहिती समोर येत आहे. त्याला उपचारासाठी जे जे रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र डॉक्टरने या कार्यकर्त्याला मृत घोषित केले आहे.