Sunday, August 31, 2025 11:48:41 AM

Prayagraj Ganpati: प्रयागराजमध्ये गणेशोत्सवाची 50 वर्ष जुनी परंपरा, एक हजार मोदकांच्या नैवेद्यासह...

प्रयागराजमध्ये 50 वर्षांपूर्वीपासून गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येत आहे. यंदाही बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडपात गजाननाच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली.

prayagraj ganpati प्रयागराजमध्ये गणेशोत्सवाची 50 वर्ष जुनी परंपरा एक हजार मोदकांच्या नैवेद्यासह

उत्तर प्रदेश: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रातूनच गणेशोत्सवाच्या संस्कृतीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्वी काळापासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि त्यानंतर इतर राज्यातही गणेशोत्सव साजरा केला जाऊ लागला. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्येही गणेशोत्सव साजरा केला जातो. प्रयागराजमध्ये 50 वर्षांपूर्वीपासून गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येत आहे. यंदाही बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी मंडपात गजाननाच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. प्रयागराजमध्ये स्थानिक नागरिकांनी नव्हे तर 50 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून आलेल्या 250 मराठी कुटुंबांनी गणेश महोत्सवाचा पाया घातला. प्रयागराजमध्ये जे आधी अलाहाबाद होते. या ठिकाणी गणपती उत्सव सुरू करण्याचे श्रेय महाराष्ट्र लोकसेवक मंडळ आणि लोकमान्य टिळक सेवा ट्रस्टला जाते. 

गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी सहस्रमोदक हवन
ट्रस्टचे विश्वस्त विवेक पुराणिक म्हणतात की, मराठी कुटुंबे दारागंजच्या नागड खानामध्ये येऊन स्थायिक झाली होती. आता त्यांची संख्या सुमारे 50 पर्यंत कमी झाली आहे. यापैकी 60 टक्के लोक दारागंजमध्ये राहतात आणि उर्वरित लोक इतर भागात राहतात. पुराणिक म्हणाले की, गेल्या 46 वर्षांपासून अलोपीबागच्या ट्रस्ट परिसरात 10 दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. महाराष्ट्राच्या धर्तीवर, गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी सहस्रमोदक हवन हे मुख्य आकर्षण असते.

हेही वाचा: Lalbaugcha Raja History: नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचा 91 वर्ष जुना इतिहास, जाणून घ्या..

प्रयागराजमध्ये कोणीही असा कार्यक्रम आयोजित करत नाही, ज्यामध्ये 1008 मोदकां नैवेद्यासह गणपतीसाठी हवन केले जाते. दरम्यान अथर्वशीर्ष पठण केले जाते. एका पठणासाठी 15 मिनिटे लागतात. हवनाची सर्वात मोठी खासियत म्हणजे प्रत्येक मराठी कुटुंबात शुद्ध देशी तुपापासून मोदक तयार केले जातात. 

मोदकांसह हवन केल्यानंतर, ते कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटले जातात. गणेशोत्सव आयोजित केला जाणारा परिसर सैन्याने ट्रस्टला 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिला होता. यासाठी ट्रस्टकडून दरमहा दोन हजार रुपये सैन्याला दिले जातात.

 

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही किंवा याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री