Monday, September 01, 2025 12:59:49 PM

Bihar Election 2025: मायावतींची मोठी घोषणा; बिहारमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढणार

बसपा या निवडणुका स्वबळावर लढवणार असून, यासाठीची प्रमुख जबाबदारी त्यांच्या पुतण्यावर आणि बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

bihar election 2025 मायावतींची मोठी घोषणा बिहारमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढणार

Bihar Election 2025: बहुजन समाज पक्ष (बसपा) प्रमुख मायावती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, बसपा या निवडणुका स्वबळावर लढवणार असून, यासाठीची प्रमुख जबाबदारी त्यांच्या पुतण्यावर आणि बसपाचे राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

जबाबदाऱ्या निश्चित 

आकाश आनंद यांच्यासोबत केंद्रीय समन्वयक आणि राज्यसभा खासदार रामजी गौतम बिहारमधील पक्ष संघटना आणि निवडणुकीची रणनीती सांभाळतील. दोन दिवस चाललेल्या बैठकीत मायावतींनी बिहारमधील निवडणूक तयारीचा आढावा घेतला. मायावतींनी सोशल मीडियावर लिहिले की, आगामी काही महिन्यांत होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारांची निवड, प्रचार मोहीम आणि पक्षाच्या कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे.

हेही वाचा - Ethanol Fuel: सर्व वाहनांसाठी E20 पेट्रोल अनिवार्य होणार का? सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी

विधानसभा जागांची विभागणी

बैठकीत मायावतींनी पक्ष कार्यकर्त्यांना सर्व उणिवा दूर करून तन, मन आणि धनाने निवडणूक लढवण्याचे आवाहन केले. पुढील महिन्यापासून बिहारमध्ये पक्ष यात्रांपासून ते सार्वजनिक सभा आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम बसपा प्रमुख मायावतींच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. बिहारमधील सर्व विधानसभा जागा तीन झोनमध्ये विभागून वरिष्ठ नेत्यांना स्वतंत्र जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. बदलणारी राजकीय परिस्थिती आणि निवडणूक समीकरणे लक्षात घेऊन बसपा राज्यात चांगले निकाल देईल, असा विश्वास पक्ष नेत्यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा Manoj Jarange Patil On Raj Thackeray: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगेंनी राज ठाकरेंना सुनावले

इतर राज्यांचाही आढावा - 

मायावतींनी सांगितले की, बिहारसोबतच ओरिसा आणि तेलंगणा येथेही पक्ष संघटनेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच जिल्हा ते मतदान केंद्र पातळीपर्यंत संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या घोषणेनंतर बिहारमधील निवडणुकीचे राजकारण अधिक चुरशीचे होण्याची शक्यता आहे. 


सम्बन्धित सामग्री