भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (30 ऑगस्ट 2025) युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवर संवाद साधला. युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भारताची वचनबद्धता त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया 'X' वर पोस्ट करत म्हटले आहे की, 'आजच्या फोन कॉलबद्दल राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे आभार. आम्ही सध्या सुरू असलेल्या संघर्षावर, त्याच्या मानवतावादी पैलूंवर, शांतता आणि स्थैर्य पुनर्संचयित करण्याच्या प्रयत्नांवर विचारांची देवाणघेवाण केली. या दिशेने सर्व प्रयत्नांना भारत पूर्णपणे पाठिंबा देतो.
हेही वाचा - Israel Air Strike : भयंकर ! युद्ध काही थांबेना ; इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुतीच्या पंतप्रधानांचा मृत्यू
दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट केले की, 'मी पंतप्रधान मोदींना वॉशिंग्टनमध्ये युरोपियन नेत्यांशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यातील चर्चेची माहिती दिली.ही एक उपयुक्त आणि महत्त्वाची चर्चा होती, ज्यामुळे खरी शांतता कशी साध्य करायची यावर भागीदारांमधील एक समान दृष्टीकोन उघड झाला. युक्रेनने रशियाच्या प्रमुखांसोबत बैठकीसाठी आपली तयारी दर्शविली.
हेही वाचा - Mumbai Megablock: गणराया पावला, लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खास गिफ्ट
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत आणि युक्रेनच्या नेत्यांनी दोन्ही देशांमधील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि परस्पर हिताच्या सर्व क्षेत्रात सहकार्य वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली. ही चर्चा अशा वेळी झाली आहे जेव्हा पंतप्रधान मोदी चीनमधील तियानजिन येथे शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि तिथे ते रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.